TOD Marathi

प्रियंका गांधी आणि मलाला यूसुफजई यांचीही हिजाब वादावर प्रतिक्रिया

संबंधित बातम्या

No Post Found

कर्नाटकमधील अनेक शाळा आणि कॉलेजमध्ये हिजाब म्हणजेच बुरख्यावरुन सुरू असलेल्या वादाने आता महाराष्ट्रातही पेट घेतलेला आहे . तसेच हा वाद आता न्यायालयात गेला असून, यावर लवकरच सुनावणी होणार आहे. एकीकडे मुस्लिम विद्यार्थिनी शाळा-कॉलेजमध्ये हिजाब परिधान करून आपला विरोध नोंदवत आहेत.तर भगवे स्कार्फ घालून हिंदू विद्यार्थीही आपला विरोध दर्शवत आहेत.

या प्रकरणावर अनेकांनी आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. अशातच या प्रकरणावर आता काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियंका गांधी यांनीही आपली प्रतिक्रिया दिली आहे.
कर्नाटकात सुरू असलेल्या हिजाब वादावर काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी यांनी ट्विट करून प्रतिक्रिया दिली आहे. प्रियंका गांधींनी लिहिलय की, ‘बिकिनी असो, जीन्स असो, हिजाब असो किंवा डोक्यावर पदर घेणे असो, महिलांना त्यांच्या इच्छेनुसार कपडे घालण्याचा अधिकार आहे. हा अधिकार त्यांना संविधानाने दिला आहे. त्यांच्यावरील अत्याचार थांबवा.’ ‘लडकी हूं, लड सकती हूं’ असे म्हणत प्रियंकानी या मोहिमेचा हॅशटॅगही टाकला आहे.

कर्नाटकात सुरू असलेल्या या हिजाब वादात पाकिस्तानची सामाजिक कार्यकर्ता तसेच शांती नोबेल पुरस्कार विजेती मलाला यूसुफजई देखील या वादावर आपली प्रतिक्रिया दिली आहे. ‘हिजाब परिधान केलेल्या मुलींना शाळेत प्रवेश करण्यापासून रोखणे भयावह आहे. महिलांना कमी-अधिक प्रमाणात कपडे घालण्यास हरकत आहे. भारतीय नेत्यांनी मुस्लिम महिलांना दुर्लक्षित करणे थांबवावे’ असे मलालाने आपल्या ट्विट मधून म्हटले आहे.