TOD Marathi

ट्रेकिंगला गेलेला तरुण कोसळला दरीत.. तब्बल एवढ्या तासांच्या प्रयत्नानंतर भारतीय लष्कराला वाचवण्यात यश..

संबंधित बातम्या

No Post Found

केरळ : केरळमधील पलक्कड जिल्ह्यातील मलमपुझा येथील डोंगरावर ट्रेकिंग साठी गेलेल्या आणि तिथे पडून अडकलेल्या एका ट्रेकरची लष्कराने बुधवारी सुटका केली. २३ वर्षीय चेराट्टिल बाबू हा ट्रेकर तब्बल ४० तासांपेक्षा जास्त काळ एका ठिकाणी अडकून पडल्याची माहिती मिळताच त्या ठिकाणी तरुणाला वाचवण्यासाठी दोन लष्करी अधिकारी, दोन जेसीओ आणि इतर पाच कॉन्स्टेबल काल रात्री वेलिंग्टन येथून घटनास्थळी पोहोचले होते.
सोमवारी दुपारी केरळच्या पलक्कड जिल्ह्यातील एलाचिराम येथे जवळच्या कुरुंबाची डोंगरावरून आर बाबू त्याच्या इतर तीन मित्रांसोबत डोंगरावरून खाली उतरत असताना दरीच्या खड्डयात पडून ही घटना घडल्याचं समोर आले आहे. त्यानंतर सुरक्षा दोरीच्या साहाय्याने बाबूला मलमपुळा येथील कुरुंबाची टेकडीवर नेले आणि तेथून त्याला विमानाने खाली नेण्याचे प्रयत्न सुरू होते. भारतीय लष्कराच्या दक्षिण कमांडच्या पर्वतारोहण तज्ज्ञांचा समावेश असलेले पथक या कारवाईची आखणी करण्यासाठी मंगळवारी रात्री उशिरा मलमपुळा येथे पोहोचले होते. त्यानंतर बुधवारी पहाटे, दक्षिण कमांडने एका ट्विटमध्ये सांगितले की, ऑपरेशन सुरू झाले आहे आणि घाटात अडकलेल्या बाबूपर्यंत पोहोचण्यासाठी अनेक ठिकाणांहून प्रयत्न केले जात आहेत.

नेमकी घटना काय घडली?

बाबूने सोमवारी त्याच्या दोन मित्रांसह डोंगरावर ट्रेकिंग करायला गेला होता. उतरताना त्याचा तोल जाऊन तो घसरत खाली खोल दरीत जाऊन पडला. या दरीची खोली शिखरापेक्षा २०० फूट असल्याचं सांगितले जातंय. दरम्यान, यावेळी बाबूच्या पायाला दुखापत झाली. तो दरीत पडल्यानंतर त्याला वाचवण्यात अयशस्वी झालेले त्याचे मित्र टेकडीच्या पायथ्याशी पोहोचले आणि अधिकाऱ्यांना कळवले त्यानंतर त्याला सोडवण्याचे प्रयत्न सुरू झाले.आणि तब्बल 40 तासांपासून सुरू असलेल्या या बचाव कार्याला अखेर यश मिळाले.