देसीगर्ल प्रियंका चोप्रा आणि निक जोनास यांना कन्यारत्न, पोस्ट शेअर करत दिली गोड बातमी

priyanka chopra - nik jones - tod marathi

मुंबई : अभिनेत्री प्रियंका चोप्रा आणि निक जोनास यांना सरोगसीच्या माध्यमातून कन्यारत्न प्राप्त झालं आहे. दोघांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करुन आई-वडील झाल्याची माहिती आपल्या चाहत्यांना दिली. प्रियंका चोप्राने तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर एक पोस्ट शेअर करत लिहिले, ” हे सांगताना खूप आनंद होत आहे की, आम्हाला सरोगसीद्वारे कन्यारत्न प्राप्त झालं असून आम्ही तिचं स्वागत केलं आहे. आम्ही आमच्या कुटुंबावर लक्ष केंद्रीत करत असल्यामुळे आम्ही तुम्हाला या विशेष काळात गोपनीयतेसाठी आदरपूर्वक आवाहन करतो. खूप खूप धन्यवाद”. निक जोनास यानेही त्याच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाउंटवर ही पोस्ट शेअर केली आहे. तर या पोस्टनंतर बॉलिवूड तसेच हॉलिवूडमधील अनेक सेलिब्रिटींनी आणि त्यांच्या चाहत्यांनी निक – प्रियांका वर अभिनंदनाचा वर्षाव केला आहे.

Please follow and like us: