अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणूक ही आता केवळ अंधेरी पूरती मर्यादित राहिली नसून राज्यभराच्या राजकारणाचं नवं केंद्रबिंदू झाली आहे. (Andheri bye election) शुक्रवारी ठाकरे गटाच्या उमेदवार ऋतुजा लटके त्याचबरोबर भाजपचे उमेदवार मुरजी पटेल (Rutuja Latke vs Murji Patel) अशा दोघांनी आपापले उमेदवारी अर्ज दाखल केले. हे उमेदवारी अर्ज दाखल करताना दोन्ही बाजूंचे प्रमुख नेते आणि पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.
दरम्यान, नितेश राणे (Nitesh Rane on Uddhav Thackeray party symbol) यांनी बोलताना ठाकरे गटाचे पक्ष चिन्ह हे मशाल नसून तो आइसक्रीमचा कोण आहे, असं म्हणत टीकास्त्र सोडलं. नितेश राणे यांच्या याच वक्तव्यावर ठाकरे गटाच्या खासदार प्रियंका चतुर्वेदी यांना विचारलं असता त्यांच्या वाक्याची दखल कदाचित त्यांचे वडीलही घेत नसतील, त्यामुळे आम्हाला त्याच्यावर बोलायचं नाही, असं म्हणत सणसणीत टोला लगावला.
त्याचबरोबर शिंदे गटावर बोलताना एक वेळ अशी येईल की त्यांच्याकडे ना चिन्ह असेल, ना पक्ष असेल, ना अस्तित्व असेल मात्र गद्दारीचा शिक्का तेवढा नक्की असेल, असं म्हणत शिंदे गटावरही टीका केली. आणि आपण अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणूक नक्कीच जिंकू असा विश्वासही व्यक्त केला.