TOD Marathi

प्राजक्ता माळी सोशल मीडियावर नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणाने सक्रिय असते. प्राजक्ताला सध्या ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ (maharashtrachi hasyajatra) या कार्यक्रमामधून सुट्टी मिळाली आहे. या मिळालेल्या वेळेमध्ये प्राजक्ता हिमालय प्रदेशमध्ये तिचा निवांत क्षण आला ट्रिपमधे एण्जॉय करत आहे.

 

या ट्रिपदरम्यानची एक पोस्ट प्राजक्ताने शेअर केली आहे. या पोस्टची सध्या सोशल मीडियावर चर्चा होतीय.

 

प्राजक्ता माळीने( prakakta mali) शेअर केली पोस्ट

 

 

View this post on Instagram

 

A post shared by Prajaktta Mali (@prajakta_official)

गेले काही दिवस प्राजक्ता हिमाचल प्रदेशमधील ट्रीप दरम्यानचे तिचे फोटो सोशल मीडियाद्वारे शेअर करताना दिसत आहे. ही तिची पहिली सोलो ट्रिप आहे. पण या ट्रिपदरम्यान तिला महाराष्ट्राची (maharashtra) अतिशय आठवण येत आहे. प्राजक्ताने तिचे हिमाचल प्रदेशमधील काही फोटो शेअर करत म्हटलं की, “पण खरं सांगू कुठल्याही सुंदर प्रदेशाचा मी जास्तीत जास्त ५ ते ६ दिवस आनंद घेऊ शकते. नंतर (काम नसेल तर) मला महाराष्ट्राची कडकडून आठवण येऊ लागते. आत्ताच पळून यावं इतकी आठवण येतेय. देवा.कसं होणार माझं?”

 

प्राजक्ताला हिमाचल प्रदेशमध्ये जाऊन जवळपास ४ ते ५ दिवस झाले आहेत. पण तिला आता महाराष्ट्राची आठवण सतावताना दिसत आहे. तिच्या या पोस्टवर नेटकऱ्यांनी वेगवेगळ्या कमेंट्स देखील केल्या आहेत. तसेच हिमाचल प्रदेशमधील तिच्या फोटोंचं भरभरून कौतुक देखील नेटकऱ्यांनी केलं आहे. प्राजक्ताला तिच्या बिझी शेड्युमधून काही दिवस तरी आराम मिळाला आहे.

 

प्राजक्ता सध्या वेबसीरिज, सुत्रसंचालन, चित्रपट या तिन्ही माध्यमांमध्ये जोमात काम करत आहे. तिच्या अभिनयाचं कौतुक नेहमीच होताना दिसतं पण ‘रानबाजार’ वेबसीरिजमधील तिच्या भूमिकेला तर प्रेक्षकांनी भरभरून प्रतिसाद दिला. आता ती पुन्हा एकदा ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ कार्यक्रमामध्ये कधी दिसणार? याची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत आहेत.