मुंबई :
एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या नेतृत्वात सरकार स्थापन होऊन महिना लोटला. जवळपास ४० दिवसानंतर एकूण 18 मंत्र्यांचा शपथविधी (Oath Ceremony) आज पार पडला. सकाळी शपथविधी पार पडल्यानंतर रात्री लगेच खातेवाटपही जाहीर करण्यात आलं आहे. खातेवाटपात नगरविकास खातं हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्याकडेच ठेवण्यात आलंय. तर गृह, अर्थ, महसूल अशी महत्वाची खाती भाजपकडे ठेवण्यात आली आहेत.
कोणत्या मंत्र्याकडे कोणतं खातं?
मुख्यमंत्रीपद शिंदेंकडे, पण…
भाजपनं मुख्यमंत्रीपद एकनाथ शिंदे यांच्याकडे दिल्यानंतर राजकीय वर्तुळात आणि सर्वसामान्य नागरिकांकडूनही आश्चर्य व्यक्त करण्यात आलं होतं. मात्र, मुख्यमंत्रीपदी एकनाथ शिंदे असले तरी महत्वाची खाती मात्र भाजपनं आपल्याकडे ठेवली आहेत. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे गृह आणि अर्थ ही महत्वाची खाती असणार आहेत. तर महसूल खातं भाजपचेच राधाकृष्ण विखे पाटील सांभाळणार आहेत. ऊर्जा खात्याची जबाबजदारी भाजप ज्येष्ठ नेते सुधीर मुनगंटीवारांकडे देण्यात आलं आहे. सार्वजनिक बांधकाम खातं चंद्रकांत पाटील यांच्याकडे देण्यात आलंय.