TOD Marathi

लोकप्रिय अभिनेते दिलीपकुमार यांचे निधन ; Social Media वर अनेकांनी वाहिली श्रद्धांजली

टिओडी मराठी, दि. 7 जुलै 2021 – हिंदी सिनेमातील दिग्गज कलाकार अशी ओळख मिळविलेले लोकप्रिय अभिनेते दिलीपकुमार यांचे मुंबईच्या हिंदुजा रुग्णालयात बुधवारी सकाळी निधन झाले. ते ९८ वर्षांचे होते. श्वसनाचा त्रास होऊ लागल्याने त्यांना रुग्णालयामध्ये दाखल केलं होतं. तेथेच सकाळी त्यांची प्राणज्योत मालवली.

दिलीप कुमार यांचा दफनविधी सायंकाळी ५ वाजता जुहू इथल्या कबरस्तानात इथं होणार आहे, असे ट्विटर वरून कळविले आहे. दिलीप कुमार यांच्या मागे पत्नी, अभिनेत्री सायराबानो आहेत. दिलीपकुमार यांच्या निधनाची वार्ता समजताच फिल्म इंडस्ट्रीमध्ये शोककळा पसरली असून सोशल मीडियावर त्यांना श्रद्धांजली वाहिली जात आहे.

११ डिसेंबर १९२२ साली पाकिस्तानामध्ये जन्मलेल्या दिलीपकुमार यांचे मूळ नाव युसुफ खान असे आहे. नाशिक येथे त्यांचे प्राथमिक शिक्षण झाले. तेव्हाच त्यांनी अभिनयामध्ये करियर करण्याचे ठरविले होते. सिनेसृष्टीत त्यांनी दिलीपकुमार याच नावाने लोकप्रियता मिळविली. १९४४ साली ज्वारभाटा मधून त्यांनी सिनेमात पाउल टाकलं पण, सुरवातीचे त्यांचे चित्रपट चालले नाहीत. नूरजहान बरोबर त्यांची जोडी हिट झाली. ‘जुगनु’ हा त्याचा पहिला हिट झालेला चित्रपट होता.

‘जुगनु’ नंतर दिलीपकुमार यांनी अनेक हिट चित्रपट दिले. ‘मुगले आझम’ त्यांचा सर्वाधिक कमाई करणारा आणि निर्मितीसाठी सर्वाधिक खर्चिक चित्रपट होता. या चित्रपटाने अनेक रेकॉर्ड केले. दिलीपकुमार यांना ८ फिल्मफेअर पारितोषिके मिळाली. अभिनयात सर्वाधिक अॅवॉर्ड मिळविल्याची नोंद गिनीज बुकमध्ये दिलीपकुमार यांच्या नावावर आहे.

१९९१ साली त्यांना पद्मभूषण आणि २०१५ मध्ये त्यांना पद्मविभूषण पुरस्काराने सन्मानाने गौरविले आहे. १९९४ मध्ये त्यांना दादासाहेब फाळके पारितोषिक देऊन गौरविले आहे. २००० ते २००६ या काळात ते राज्यसभा सदस्य देखील होते. १९९८ मध्ये पाकिस्तान सरकारने ‘ निशान ए इम्तियाज’ या पाकिस्तानातील सर्वोच्च नागरी सन्मानाने त्यांना गौरवले.

Warning: Undefined array key "arrow_bg_color" in /home/kiftjbmy/public_html/todmarathi/wp-content/plugins/theplus_elementor_addon/modules/widgets/tp_dynamic_listing.php on line 7016

Warning: Undefined array key "arrow_icon_color" in /home/kiftjbmy/public_html/todmarathi/wp-content/plugins/theplus_elementor_addon/modules/widgets/tp_dynamic_listing.php on line 7017

Warning: Undefined array key "arrow_hover_bg_color" in /home/kiftjbmy/public_html/todmarathi/wp-content/plugins/theplus_elementor_addon/modules/widgets/tp_dynamic_listing.php on line 7018

Warning: Undefined array key "arrow_hover_icon_color" in /home/kiftjbmy/public_html/todmarathi/wp-content/plugins/theplus_elementor_addon/modules/widgets/tp_dynamic_listing.php on line 7019

Tags

वेब स्टोरीज