TOD Marathi

Galvan Valley मध्ये Chinese सैन्याला नडलेल्या ‘त्या’ 20 जवानांना वीरतेचे Police Medal जाहीर

संबंधित बातम्या

No Post Found

टिओडी मराठी, दि. 14 ऑगस्ट 2021 – देशाच्या 75 व्या स्वातंत्र्य सोहळ्याच्या निमित्ताने 1380 पोलीस पदकांची घोषणा केली आहे. यात आयटीबीपीच्या 23 जवानांना स्वातंत्र्य दिनी वीरता पुरस्काराने सन्मानित केले जाणार आहे. यात 20 जवान हे मागील वर्षी चीनच्या सैनिकांना गलवान खोऱ्यात भिडले होते आणि वीरमरण पत्करले होते.

आयटीबीपीने दिलेली माहिती अशी, लडाखच्या भारत-चीन सीमेवर मागील वर्षी जून महिन्यात गलवान खोऱ्यातील वेगवान प्रवाहाच्या नदीत भारतीय सैनिकांवर चीनने हल्ला केला होता.

यावेळी भारतीय सैनिकांनी चिनी सैनिकांचा हल्ला माघारी परतवून लावताना चिनी सैनिकांचे मोठे नुकसान केले होते. चीनने अद्याप किती सैनिक मारले गेले? याचा आकडा जाहीर केलेला नाही. तरीदेखील 40 हून अधिक सैनिक मारले गेल्याचे सांगितले जात आहे.

आयटीबीपीने सांगितले की, सीमेवरील संघर्ष आणि सुरक्षा कर्तव्यांसाठी जवानांना आतापर्यंत दिलेले हे सर्वाधिक वीरता पदक आहेत. दरवर्षी स्वातंत्र्य दिनी देशाची सेवा व बलिदानासाठी वीरता पुरस्काराची घोषणा केली जाते.

तेथील नदीच्या पाण्याचा वेगवान प्रवाह आणि त्यात चीनी सैनिकांनी केलेला पाठीत वार अशा परिस्थितीतही भारतीय जवानांनी शौर्य गाजवले होते. शस्त्रास्त्रांचा वापर न करता चिनी सैनिकांसोबत या जवानांनी सुमारे 17 ते 20 तास लढाई केली.

चीनी सैनिकांनी दगड, लोखंडी काटेरी जाळ्या असलेले रॉड आदींनी हल्ला केला होता. रक्तबंबाळ झाले तरीही या जवानांनी चिनी सैनिकांना प्रत्यूत्तर दिले होते. मात्र, या झटापटीत आपले 20 जवान शहीद झाले.

जाणून घ्या, 1380 पदके कोणासाठी –
स्वातंत्र्य सोहळ्यात यावेळी 1380 पदके दिली जाणार आहेत. यात वीरतेसाठी राष्ट्रपतींचे 2 पोलीस पदक, वीरतेसाठी 628 पोलीस पदक, विशिष्ट सेवेसाठी 88 राष्ट्रपती पोलीस पदक आणि उत्कृष्ट सेवेसाठी 662 पोलीस पदक देणार आहेत.

तर 628 पोलीस पदकांपैकी जम्मू-कश्मीर 256, सीआरपीएफला 151, आयटीबीपीला 23 वीरता पुरस्कार दिले जाणार आहेत. याशिवाय ओडिशा पोलीस 67, महाराष्ट्र पोलीस 25 आणि छत्तीसगड पोलिसांना 20 पुरस्कार दिले जाणार आहेत.