TOD Marathi

Actor मिथुन चक्रवर्ती यांची Police चौकशी; प्रक्षोभक भाषणामुळे उसळला हिंसाचार, हजर राहण्याचे निर्देश

टिओडी मराठी, दि. 16 जून 2021 – पश्चिम बंगाल निवडणुकीच्या प्रचारादरम्यान केलेल्या विधानांप्रकरणी अभिनेते मिथुन चक्रवर्ती यांची कोलकाता पोलिसांनी बुधवारी चौकशी केली आहे. मिथुन चक्रवर्ती हे या निवडणुकीपूर्वी भाजपमध्ये सामील झाले होते. निवडणुकीच्या प्रचारादरम्यान त्यांनी केलेले भाषण हे प्रक्षोभक आहे, असा आरोप करत त्यांच्याविरोधात तक्रार दाखल केली होती.

तक्रारीच्या आधारे गुन्हा दाखल केला होता. आणि तो गुन्हा रद्द करण्यासाठी मिथुन चक्रवर्ती यांनी कोलकाता उच्च न्यायालयात एक याचिका दाखल केली होती. यावर सुनावणी करताना न्यायालयाने मिथुन यांना व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे पोलिसांसमोर चौकशीसाठी हजर व्हावे, असे निर्देश दिले होते.

मिथुन यांनी एका याचिकेद्वारे त्यांच्याविरुद्ध दाखल केलेला गुन्हा रद्द करावा, अशी मागणी केली होती. या याचिकेच्या सुनावणीदरम्यान न्यायालयाने तपास अधिकाऱ्यांना निर्देश दिले होते की, मिथुन यांना चौकशीसाठी हजर होण्यासाठी तर्कसंगत मुदत द्यावी. त्यानुसार मिथुन यांना व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे चौकशीसाठी हजर राहण्यास सांगितलं होतं. याची पुढील सुनावणी 18 जून रोजी होणार आहे.

मिथुन यांनी त्यांच्या याचिकेमध्ये म्हटले आहे की, त्यांनी चित्रपटातील काही संवाद बोलून दाखवले होते. जे केवळ विनोदासाठी म्हटले होते. आपण निर्दोष आहे. कोणताही गुन्हा केलेला नाही, असा युक्तिवाद त्यांच्यातर्फे वकिलांनी केलाय.

पश्चिम बंगाल निवडणुकीसाठीच्या प्रचारादरम्यान मिथुन यांनी ब्रिगेड परेड इथे मैदानामध्ये झालेल्या सभेत भाषण केलं होतं. या भाषणात त्यांनी चित्रपटातील काही संवाद बोलून दाखवले. या संवादांमुळे निवडणुकीनंतर पश्चिम बंगालमध्ये हिंसाचार उसळला, असा आरोप केला आहे.

Warning: Undefined array key "arrow_bg_color" in /home/kiftjbmy/public_html/todmarathi/wp-content/plugins/theplus_elementor_addon/modules/widgets/tp_dynamic_listing.php on line 7016

Warning: Undefined array key "arrow_icon_color" in /home/kiftjbmy/public_html/todmarathi/wp-content/plugins/theplus_elementor_addon/modules/widgets/tp_dynamic_listing.php on line 7017

Warning: Undefined array key "arrow_hover_bg_color" in /home/kiftjbmy/public_html/todmarathi/wp-content/plugins/theplus_elementor_addon/modules/widgets/tp_dynamic_listing.php on line 7018

Warning: Undefined array key "arrow_hover_icon_color" in /home/kiftjbmy/public_html/todmarathi/wp-content/plugins/theplus_elementor_addon/modules/widgets/tp_dynamic_listing.php on line 7019

Tags

वेब स्टोरीज