TOD Marathi

दसरा मेळाव्यात अपेक्षेप्रमाणे उद्धव ठाकरेंनी शिंदे गटावर जोरदार प्रहार केला. एकनाथ शिंदे यांच्यावर टीका करत असतानाच तथाकथित सर्व हिंदुत्ववाद्यांनी एका मंचावर यावं, माझीही यायची तयारी आहे. त्यांनी त्यांचं हिंदुत्व मांडावं मी माझं वडिलोपार्जित हिंदुत्व मांडतो, माझी तयारी आहे. (Uddhav Thackeray criticized Eknath Shinde in Dasra Melava speech) असं म्हणत त्यांच्या हिंदुत्वावर टीका करणाऱ्यांना चांगलंच फैलावर घेतलं. त्यासोबतच मी छत्रपती शिवाजी महाराजांची, माझ्या आई-वडिलांची शपथ घेऊन सांगतो की भाजप आणि शिवसेनेने अडीच-अडीच वर्षांचा मुख्यमंत्रीपद देण्याचं ठरलं होतं, असा दावा पुन्हा एकदा उद्धव ठाकरे यांनी केला.

उद्धव ठाकरे यांच्या भाषणातील प्रमुख मुद्दे;

  • माझ्या आईवडिलांची शपथ घेऊन सांगतोय, भाजप आणि शिवसेनेचा अडीच-अडीच वर्ष मुख्यमंत्री करायचा असं ठरलं होतं.
  • तुमचं प्रेम पाहून भारावून गेलो आहे.
  • कुठलाही अनुभव नसताना मुख्यमंत्रीपद अडीच वर्ष तुमच्या सर्वांच्या प्रेमाने सांभाळलं.
  • हे प्रेम विकत मिळत नाही, हे माझ्या जिवाभावाच्या शिवसैनिकांची गर्दी आहे.
  • गद्दारांना मिळालेले मंत्रीपद तात्पुरती आहेत मात्र गद्दारीचा शिक्का आजन्म राहील.
  • डॉक्टरांनी अजूनही वाकायची परवानगी दिली नाही मात्र तुमच्यासमोर नतमास्तक झाल्याशिवाय पुढे जाऊ शकत नाही.
  • होय, गद्दारांना गद्दारच म्हणणार.
  • मेळाव्यानंतर रावण दहन होणार पण यंदाचा रावण वेगळा आहे.
  • यंदाचा रावण 50 खोक्यांचा, खोकासुर आहे.
  • इथे एकही व्यक्ती भाड्याने आणलेला नाही, ही निष्ठावंतांची गर्दी आहे.
  • एकही निष्ठावंत शिवसैनिक जेव्हा म्हणेल की तुम्ही पक्षप्रमुख नको, त्या क्षणी पद सोडेन.
  •  राज्यात आमदार धमकीवजा भाषा वापरतात, ही कायद्याची भाषा आहे?
  •  फडणवीस जाताना पुन्हा येईन म्हणाले आणि आले दीड दिवसांसाठी.
  • आनंद दिघेंना जाऊन वीस वर्षे झाली, त्यानंतर दिघे आठवले.
  • भाजपची साथ सोडली म्हणजे हिंदुत्व सोडला असं नाही.
  • मुख्यमंत्री 100 पैकी 90 दिवस दिल्लीला गेले असतील.
  • तथाकथित हिंदुत्ववाद्यांनी एका व्यासपीठावर यावं, त्यांनी त्यांचं हिंदुत्व सांगावं मी माझं वडिलोपार्जित हिंदुत्व सांगतो.
  • आमचे हिंदुत्व हे शेंडी जाणव्याचं हिंदुत्व नाही, आमचं हिंदुत्व हेच राष्ट्रीयत्व आहे.
  • सर्व पक्ष संपतील आणि एकच पक्ष राहील तो म्हणजे हुकूमशाही.
  • भारतमातेला हुकूमशाहीकडे नेण्याची वाटचाल सुरू आहे.
  • देशप्रेमींनी एकत्र यावं आणि स्वातंत्र्य अबाधित ठेवावं.
  • मोहन भागवतांबद्दल आदर पण मशिदीत कशासाठी जाताय?
  • मोहन भागवत म्हणतात स्त्री-पुरुष समानता हवी, मात्र देशात महिला शक्तीचा आदर कुठे होतोय?
  • ‘हे’ तोतये बाळासाहेबांचा चेहरा लावून शिवसेना पळवायला आले आहेत.
  • शिवाजी महाराज पार्क मैदान काय बापाची पेंड आहे?
  • माझं तुम्हाला आव्हान आहे, एकाच व्यासपीठावर आपले विचार मांडायचे, माझी तयारी आहे. फक्त तुम्ही भाजपची स्क्रिप्ट न घेता भाषण करायचं…
  • यांचं नुसतं घोषणांचा पाऊस आणि घोषणांची अतिवृष्टी आणि अंमलबजावणीचा दुष्काळ.
  • ही गद्दारी त्या रावणासारखी जळून भस्म होणार आहे.
  • एका अर्थी झालं ते बरं झालं, हे बांडगुळे सगळी छाटली गेली.
  • फडणवीसजी, आम्ही कायदा पाळायचा! आणि तुम्ही डुकरं पाळायची?