TOD Marathi

सध्या विधानपरिषद निवडणुकीच्या (Vidhan Parishad election) पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण चांगलचं तापल्याचं बघायला मिळतंय. याही निवडणुकीत भाजपकडून पुन्हा एकदा पंकजा मुंडे (pankaja Munde) यांना डावलण्यात आलं आहे. या आधीही राज्यसभा आणि विधानपरिषदेसाठी त्यांच्या नावाची चर्चा सुरु होती. परंतू त्यांना एकही संधी मिळाली नाही. उमेदवारी न मिळाल्यानं पंकजा मुंडे यांचे समर्थक भयंकरनाराज झाले आहेत. अशातच पंकजा मुंडे आता या 21 जूनला पाथर्डीतीली  (Pathardi) मोहटा देवीचं दर्शन घेणार आहेत. यावेळी त्या पाथर्डीतील भाजप कार्यकर्त्यांशी आपला साधणार संवाद साधणार आहेत. तसेच यावेळी त्या मुकुंद गर्जे या कार्यकर्त्याचीही घेणार भेट घेणार असल्याचं समजतंय.

पंकजा मुंडे यांना भाजपने उमेदवारी नाकारल्यानंतर त्यांची कार्यकर्ते मुकुंद गर्जे यांनी आत्महत्येचा प्रयत्न केला होता. त्यानंतर आता पंकजा मुंडे त्या कार्यकर्त्याची भेट घेणार आहेत.  दरम्यान, 21 जूनच्या पंकजा मुंडे यांच्या स्वागताची कार्यकर्त्यांनी जोरदार तयारी सुरु केली आहे. ‘चलो मोहटादेवी’ असे बॅनर देखील सोशल मीडियावर झळकत आहेत. भाजपकडून पंकजा मुंडे यांना डावलल्याची कार्यकर्त्यांकडून भावना व्यक्त केली जातेय त्यावर पंकजा मुंडे काय बोलणार याकडं सर्वांचं लक्ष लागलं आहे. त्यामुळं पंकजा मुंडेंच्या दौऱ्याकडं सर्वाचं लक्ष लागलं आहे.

21 जूनला देवीचं दर्शन घेतल्यानंतर पंकजा मुंडे भाजपच्या कार्यकर्त्यांशी संवाद साधणार आहेत. आपल्या धडाकेबाज वक्तृत्वासाठी प्रसिद्ध असलेल्या पंकजा गोपीनाथ मुंडे या पुन्हा एकदा आमदारकीपासून वंचित राहिल्या आहेत. भाजपने पाच उमेदवारांची घोषणा केली त्यात पंकजा मुंडे यांना संधी मिळाली नाही. उलट भाजपा महिला मोर्चाच्या प्रदेशाध्यक्ष आणि ओबीसी समाजातून येणाऱ्या उमा खापरे यांना आमदारकी दिली आहे. याबद्दल केंद्रीय पातळीवरुन निर्णय झाल्याचा दावा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केला होता. पंकजा मुंडे सध्या राज्याच्या राजकारणात फारशा सक्रिय नाहीत. त्यांच्यावर मध्यप्रदेशच्या सहप्रभारी म्हणून जबाबदारी देण्यात आली आहे. परंतु ओबीसींच्या मुद्द्यावर त्यांनी आक्रमकपणे भूमिका मांडली होती. त्यामुळे सध्याच्या घडामोडी पाहता पंकजा मुंडे यांना संधी मिळेल असं वाटलं होतं पण ते झालं नाही.

Warning: Undefined array key "arrow_bg_color" in /home/kiftjbmy/public_html/todmarathi/wp-content/plugins/theplus_elementor_addon/modules/widgets/tp_dynamic_listing.php on line 7016

Warning: Undefined array key "arrow_icon_color" in /home/kiftjbmy/public_html/todmarathi/wp-content/plugins/theplus_elementor_addon/modules/widgets/tp_dynamic_listing.php on line 7017

Warning: Undefined array key "arrow_hover_bg_color" in /home/kiftjbmy/public_html/todmarathi/wp-content/plugins/theplus_elementor_addon/modules/widgets/tp_dynamic_listing.php on line 7018

Warning: Undefined array key "arrow_hover_icon_color" in /home/kiftjbmy/public_html/todmarathi/wp-content/plugins/theplus_elementor_addon/modules/widgets/tp_dynamic_listing.php on line 7019

Tags

वेब स्टोरीज