टिओडी मराठी, मुंबई, दि. 28 जून 2021 – महाराष्ट्रामध्ये ओबीसींचं राजकीय आरक्षण न्यायालयाने रद्द केलं आहे. त्यामुळे राज्याचे राजकारण तापल आहे, भाजप या मुद्दावर आक्रमक झालेत. विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात भाजपने राज्यभरात चक्काजाम आंदोलन केलं. मात्र, ओबीसी आरक्षण केंद्रातील मोदी सरकार व राज्यातील तत्कालीन देवेंद्र फडणवीस सरकरमुळे गेलं आहे, असा आरोप प्रा. हरी नरके यांनी केलाय. या संदर्भात त्यांनी पुरावेही सादर केलेत.
प्रा. हरी नरके यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटलं की, स्वत: फडणवीस 1 ऑगस्ट 2019 ला ओबीसी आरक्षणासाठी सामाजिक-आर्थिक-जात जनगणना 2011 चा डेटा केंद्र सरकारला पत्र लिहून मागतात.
त्यांना मोदी सरकारचे 20 नोव्हेंबर 2019 ला उत्तर येते. या डेटावर अजून अभ्यास सुरु आहे. तरीही ही गँग ओबीसीचा बुद्धीभेद करणारी, धादांत खोटी वक्तव्ये दररोज करीत आहेत.
पुन्हा ते सांगतात, केंद्राचा संबंध नाही, जणगणनेचा डेटा चालत नाही. राज्याने डेटा जमवायचा असतो. काँग्रेस सरकारने हा डेटा रद्द/अवैध ठरवला होता. मग, तुम्ही लिहिलेले पत्र आणि तुम्हाला आलेले उत्तर काय आहे ?, लबाड गॅंगचा जाहीर निषेध, असे ही नरके यांनी म्हटलंय.
प्रा. नरके यांनी आपल्या फेसबुक पोस्टमध्ये दोन फोटो शेअर केलेत. जे की तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केंद्र सरकारला पाठवले होते. सध्या भाजप ओबीसी आरक्षणाच्या मुद्दावर आक्रमक आहे.
ओबीसी आरक्षण रद्द होण्यास महाराष्ट्रातील महाविका आघाडी सरकारचे जबाबदार आहे, असे त्यांनी म्हटलं आहे. त्यामुळे या मुद्दावरून सत्ताधारी विरोधक आमने-सामने आलेत.