टिओडी मराठी, दि. 9 जून 2021 – पेट्रोल पंपावर लागणाऱ्या रांगा कमी करण्यासाठी आता सीएनजी सुद्धा फिरत्या वाहनातून पुरविण्याची सुविधा देशात सुरु झालीय. केंद्रीय पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्र प्रसाद यांनी मंगळवारी सीएनजी फिरत्या इंधन आपूर्ती सुविधेचे उद्घाटन केले आणि याबाबत माहिती दिली.
अशी सुविधा देणारे पहिले केंद्र इंद्रप्रस्थ गॅस लिमिटेड कंपनीने दक्षिण दिल्लीमध्ये सुरु केले आहे. दिल्लीसह आसपासच्या परिसरात ही कंपनी सेवा देणार आहे.
महाराष्ट्रात इंधन आपुर्ती सुविधा युनिट महानगर गॅस लिमिटेडने रायगडमध्ये तैनात केले आहे. या वाहनामदहये १५०० किलो सीएनजी ठेवता येतो. दररोज साधारण १५० ते २०० वाहनांना उपलब्ध करून दिला जातोय. जेथे सीएनजी स्टेशन जवळ नाही तेथे ही वाहने उपयुक्त ठरणार आहेत.
केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी या केंद्राचे उद्घाटन केल्यानंतर देशात २०१ सीएनजी स्टेशन राष्ट्राला समर्पित केल्याची घोषणा केली. ते म्हणाले सुरवातीला सीएनजी आणि पाईप गॅस महानगरात उपलब्ध होता. पण, आता निमशहरी भागात आणि छोट्या शहरात ही सुविधा दिली जातेय.
2030 पर्यंत नैसर्गिक वायू उर्जेचा खप ६.२ टक्क्यांवरून १५ टक्क्यांवर नेणार आहे. हायड्रोजन, बायोगॅस, इथेनॉल मिश्रित पेट्रोल, एलएनजी अशा स्वच्छ इंधन वापरावर जोर देणार आहे, असे त्यांनी यावेळी सांगितले. इंडीयन ऑइल बडोदा येथे लवकर हायड्रोजन स्टेशन सुरु करत आहे, असेहि सांगितले आहे.