टिओडी मराठी, नवी दिल्ली, दि. 13 जुलै 2021 – केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी काल नीटच्या युजी परीक्षेची तारीख जाहीर केल्यानंतर आजपासून या परीक्षेच्या ऑनलाईन रजिस्ट्रेशनला सुरुवात झालीय. त्या पाठोपाठ आता आता नीट पोस्ट ग्रॅज्युएशन परीक्षेच्या तारखेचीही घोषणा केली आहे. केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री मनसुख मंडाविया यांनी ट्विट करून परीक्षेच्या तारखेची घोषणा केलीय.
डॉक्टर होण्याची स्वप्न बघणाऱ्या विद्यार्थ्यांना नीट ही परीक्षा देणं आवश्यक असतं. तर एमबीबीएस केल्यानंतर पोस्ट ग्रॅज्युएशनसाठी प्रवेश हवा असेल तर नीट पीजी हे प्रवेश परीक्षा येण्याची गरज असते.
नीट पीजी हे परीक्षा आता 11 सप्टेंबर 2021 ला घेणार आहे, अशी माहिती केंद्रीय आरोग्य मंत्र्यांनी दिलीय.
नीट युजी परीक्षेप्रमाणे या परीक्षेसाठीही विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्र उपलब्ध करून देणार आहेत. कोरोनाच्या नियमांचं पालन करण्यासह परीक्षा केंद्रांवर विद्यार्थ्यांना मास्कचं वाटप करणार आहे.
तसेच विद्यार्थ्यांच्या येण्या – जाण्याच्या वेळेचे स्लॉट्स निश्चित करणार आहेत. तसेच सर्व प्रकारचं रजिस्ट्रेशन हे शारीरिक संपर्क न होता असणार आहे. सोशल डिस्टंसिंगबाबतही संपूर्ण खबरदारी घेणार आहे, अशी माहिती सूत्रांकडून मिळालीय.