TOD Marathi

अतिरिक्त आयुक्त Rubel Agarwal यांची मुंबईला बदली ; तर Ravindra Binwade यांची पुणे मनपाच्या अतिरिक्त आयुक्तपदी निवड

संबंधित बातम्या

No Post Found

टिओडी मराठी, पुणे, दि. 13 जुलै 2021 – पुणे महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्त रूबल अग्रवाल यांची मुंबई इथं बदली झाली आहे. अग्रवाल यांच्याकडे एकात्मिक बाल विकस योजनेच्या आयुक्तपपदाची जबाबदारी दिली आहे. तर, महापालिकेतील रिक्त झालेल्या अतिरिक्त आयुक्तपदी जालन्याचे जिल्हाधिकारी रविंद्र बिनवडे यांची नियुक्ती केली आहे.

अग्रवाल यांची महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्तपदी अग्रवाल यांची 1 जानेवारी 2019 ला नियुक्ती केली होती. त्यानंतर, अवघ्या वर्षभराने शहरामध्ये उद्भवलेल्या करोना संकटात शहरात आलेल्या पहिल्या व दुसऱ्या लाटेत करोना नियंत्रणाची जबाबदारी उल्लेखनियरित्या त्यांनी सांभाळली आहे. याची दखल राज्य शासनाने वेळेवेळी घेतली होती.

करोना संकटात जंबो हॉस्पीटलची उभारणी, खासगी हॉस्पीटलचे बेड ताब्यात घेणे, महापालिका ऑक्‍सिजन निर्मितीत आत्मनिर्भर करणे यासाठी त्यांनी विशेष प्रयत्न केले आहेत. तर करोना काळात महापालिकेची उत्पन्नवाढ तसेच सीएसआर अंतर्गत महापालिकेसाठी निधी मिळविण्यात त्यांनी भूमिका बजावली आहे.

तर काही दिवसांपूर्वीच त्यांच्या पुढाकारातून शहरामध्ये तिसऱ्या लाटेचे संकट थोपविण्यासाठी देशातील पहिले लहान मुलांचे कोवीड रुग्णालय उभारण्यास मुलांसाठी बेडच्या व्यवस्थापनाचे काम हाती घेतले होते.