जयपूर: नॅशनल टेस्ट एजन्सि तर्फे घेण्यात येणाऱ्या वैद्यकीय प्रवेश परीक्षेच्या पेपरचा मोठा सौदा झाला असल्याची माहिती समोर येत आहे. या बद्दलची सविस्तर माहिती जयपूर पोलिसांनी सोमवारी दि. १३ सप्टेंबेर रोजी रात्री उशिरा दिली. पेपेर लिक प्रकरणात ८ जणांना अटक देखील करण्यात आली असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
नीट परीक्षेचा पेपर रविवारी दुपारी २:३० च्या दरम्यान लिक झाल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. परीक्षा सुरू होण्या आधीच हा पेपर फुटला होता. त्यानंतर शहरातील चित्रकूट येथील एका फ्लॅटमध्ये एका व्यक्तीकडे हा पेपर पोहोचला आणि त्या व्यक्तीने पेपर सोडवून म्हणजेच पेपर मधील प्रश्नांची उत्तरे लिहून हा पेपर पुनः परीक्षा केंद्रात पोहोचला.
सहायक पोलिस उपायुक्त रिचा तोमर यांनी सांगितलं की, पेपर लिक होणार असल्याची माहिती कॉन्स्टेबलकडे मिळाली होती. त्यानुसार त्यांनी तपास सुरू केला होता. राजस्थान इंस्टीट्यृट ऑफ इंजीनियरिंग अँड टेक्नोलॉजीच्या परीक्षा केंद्रातील इंविजीलेटर पेपर परीक्षा केंद्रच्या बाहेर नेऊन त्यातील प्रश्नांची उत्तरं काढून वापस परीक्षेसाठी असलेल्या विद्यार्थ्यांना आणून देणार होते.
परीक्षार्थी धनेश्वरी यादव साठी हा सगळा खटाटोप केल्याचे समोर आले आहे. परीक्षा केंद्रतील इंविजीलेटर रामसिंह आणि अजून एक व्यक्तीने यासाठी 35 लाख रुपयात सौदा केला असल्याचे स्पष्ट झाले आहे. मात्र फक्त एका विद्यार्थ्यासाठी ३५ लाख रुपये एवढी मोठी रक्कम घेणं जरा शंकास्पद असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.