शिवसेना नेत्या नीलम गोऱ्हे (Neelam Gorhe) या बीड जिल्हा दौऱ्यावर आहेत. या दरम्यान घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत गोऱ्हे यांनी भाजपवर निशाणा साधला आहे. ‘भाजपने दोन जणांना रोजगार मिळवून दिला आहे आणि ते म्हणजे किरीट सोमय्या आणि नवनीत राणा’ असं म्हणत नीलम गोऱ्हे यांनी थेट किरीट सोमय्या (Kirit Somiayya) आणि नवनीत राणा (Navneet Rana) यांच्यावर टीका केली आहे.
यापूर्वी राज्य सरकारने केलेल्या कामांना स्थगिती देण्याचे उद्योग सुरू असल्याचे देखील म्हटल आहे. पंकजा मुंडेंना मी बऱ्याच वर्षापासून ओळखते, त्या लोकनेत्या आहेत. त्यांचे काम देखील चांगलं आहे. त्या काय बोलल्या ते मला माहीत नाही. मात्र त्यांची प्रगती व्हावी अशा शुभेच्छा गोऱ्हे यांनी पंकजा मुंडे यांना दिल्या.
गेल्या काही दिवसांमध्ये किरीट सोमय्या आणि नवनीत राणा यांनी शिवसेनेवर विशेषतः उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे यांच्यावर टीका केली आहे. वेगवेगळ्या आंदोलनाच्या निमित्ताने शिवसेनेला निशाणावर धरण्याची एकही संधी त्यांनी सोडली नाही. त्यामुळे नवनीत राणा आणि किरीट सोमय्या या दोन लोकांना भाजपने रोजगार उपलब्ध करून दिला, अशी उपरोधिक टीका नीलम गोऱ्हे यांनी केली. नवनीत राणा आणि किरीट समय यांच्यावर टीका करत असताना पंकजा मुंडे यांच्यावर मात्र कौतुकाचा वर्षाव नीलम गोऱ्हे यांनी केला.