TOD Marathi

खासदार सुप्रिया सुळे यांच्यावर बोलताना राज्याचे कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांनी अपशब्द वापरत टीका केली. (Statement on Supriya Sule by Abdul Sattar) या विरोधात पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या (Pune city NCP andolan) वतीने अब्दुल सत्तार यांच्या विरोधात पुण्यात जोरदार घोषणाबाजी करत आंदोलन केले. सुप्रिया सुळे यांची कृषिमंत्र्यांनी व्यक्तिगत माफी मागावी व महिलांबाबत अपमानकारक विधान करणाऱ्या मंत्र्यांचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राजीनामा घ्यावा, अशी मागणी यावेळी करण्यात आली.

यावेळी बोलताना शहराध्यक्ष प्रशांत जगताप (Prashant Jagtap) म्हणाले की , “महिलांच्या बद्दल आदर नसणारी लोक आज शिवरायांच्या महाराष्ट्राचा गाडा हाकत आहेत. ही आपल्या सर्वांसाठी लाजिरवाणी गोष्ट आहे. विरोधी पक्ष व सत्ताधारी पक्षामध्ये महाराष्ट्र राज्याच्या राजकीय संस्कृतीचा एक धागा गेली अनेक वर्षे जपण्यात आलेला आहे. यामध्ये विरोधी पक्ष व सत्ताधारी पक्ष यांनी गेली अनेक वर्षे राजकारणापलीकडे जाऊन सौहार्दाचे वातावरण जपले आहे. अशामध्ये मंत्री अब्दुल सत्तार यांनी राष्ट्रवादीच्या नेत्या खासदार सुप्रिया सुळे यांच्याविषयी केलेले वक्तव्य अत्यंत अशोभनीय व असंस्कृत आहे. याचा आम्ही तीव्र निषेध करतो. असंही ते म्हणाले.

खासदार सुप्रिया सुळे यांचा अपमान म्हणजे राज्यातील तमाम महिलांचा अपमान आहे. त्यामुळे राज्य सरकारने तात्काळ अब्दुल सत्तार यांची हकालपट्टी करावी अन्यथा राष्ट्रवादी काँग्रेसच्या रोषाला सामोरे जावे लागेल! अब्दुल सत्तार सारख्या बेताल वक्तव्य करत महाराष्ट्रातील वातावरण बिघडविनाऱ्या वाचाळवीरांचा बंदोबस्त राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे पदाधिकारी नक्की करतील”. अशा संतप्त प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांकडून उमटल्या. सदर आंदोलन प्रसंगी शहराध्यक्ष प्रशांत जगताप, आमदार सुनील टिंगरे, प्रदेश प्रवक्ते अंकुश काकडे यांसह मोठ्या संख्येने पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Warning: Undefined array key "arrow_bg_color" in /home/kiftjbmy/public_html/todmarathi/wp-content/plugins/theplus_elementor_addon/modules/widgets/tp_dynamic_listing.php on line 7016

Warning: Undefined array key "arrow_icon_color" in /home/kiftjbmy/public_html/todmarathi/wp-content/plugins/theplus_elementor_addon/modules/widgets/tp_dynamic_listing.php on line 7017

Warning: Undefined array key "arrow_hover_bg_color" in /home/kiftjbmy/public_html/todmarathi/wp-content/plugins/theplus_elementor_addon/modules/widgets/tp_dynamic_listing.php on line 7018

Warning: Undefined array key "arrow_hover_icon_color" in /home/kiftjbmy/public_html/todmarathi/wp-content/plugins/theplus_elementor_addon/modules/widgets/tp_dynamic_listing.php on line 7019

Tags

वेब स्टोरीज