राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज मुंबईत राष्ट्रवादीच्या आमदारांची महत्वपूर्ण बैठक घेतली. (NCP Chief Sharad Pawar took NCP MLA meeting) या बैठकीत मध्यवर्ती निवडणुकांचे संकेत त्यांनी दिले आहेत. त्या पार्श्वभूमीवरच आमदारांना तयार राहण्याचे निर्देश देखील त्यांनी दिले असल्याची माहिती मिळत आहे.
राज्यात सध्या शिंदे – फडणवीस यांचं आलेलं सरकार पुढील सहा महिन्यात कोसळू शकते, त्यामुळे मध्यवर्ती निवडणूकीच्या तयारीला लागा, अशी सूचना शरद पवार यांनी आमदारांना दिली आहे.
दरम्यान, या बैठकीत विरोधी पक्षनेत्यांच्या निवडीबाबतही चर्चा करण्यात आली आहे. मात्र आता जयंत पाटील, अजित पवार, धनंजय मुंडे, हसन मुश्रीफ यांच्या नावाची चर्चा आहे, त्यामुळे आता नेमकं कोणाच्या नावावर शिकामोर्तब होते, हे पाहणं महत्वाचं असणार आहे.