TOD Marathi

मुंबई :

शिवसेनेचे गटनेते अजय चौधरी यांची मान्यता रद्द करण्यात आली असून गटनेतेपदी एकनाथ शिंदे हेच राहणार आहेत. (Eknath Shinde will remain as Legislative Party leader of Shivsena)) यासंदर्भात विधीमंडळाने मुख्यमंत्र्यांना पत्र पाठवत माहिती दिली आहे. त्याचबरोबर शिवसेनेचे सुनील प्रभू यांचंही मुख्य प्रतोदपद रद्द करण्यात आलं असून शिंदे गटाकडून मुख्य प्रतोदपदी भरत गोगावले यांना मान्यता देण्यात आली आहे. विधिमंडळ सचिवालयाने (Legislative Secretariat) ही मान्यता दिली असून या दोन्ही निर्णयामुळे शिवसनेच्या उद्धव ठाकरे यांना मोठा झटका बसला आहे.

कायदेशीर तरतुदीनुसार आणि कायदेशीर बाबींचा विचार करूनच विधिमंडळाने हा निर्णय घेतला असल्याचं शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर (Spokesperson of Shinde Group) म्हणाले आहेत. शिवसेनेसाठी आजचे हे दोन मोठे धक्के आहेत. याबरोबरच आज भाजपने विधानसभा अध्यक्षपदाची निवडणुकही जिंकली असून राहुल नार्वेकर हे विधानसभेचे अध्यक्ष म्हणून नियुक्त झाले आहेत. महाविकास आघाडीचे राजन साळवी यांना १०७ मत पडले असून त्यांचा पराभव झाला.

या सर्व घडामोडी होण्यापूर्वी विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीत पक्षादेश न पाळणाऱ्या बंडखोर ३९ आमदारांविरोधात शिवसेनेने विधानसभा अध्यक्षांकडे निलंबन याचिका दाखल केली होती. (Shivsena files petition against 39 rebellion mla to  Speaker Of Maharashtra assembly) पक्षाने व्हीप बजावूनही ३९ आमदारांनी पक्षादेश डावलून मतदान केलं. त्यासंबंधीचं व्हिडीओ रेकॉर्ड उपलब्ध आहे. सदर आमदारांवर अपात्रतेची कारवाई करण्यात यावी, अशी मागणी शिवसेनेचे प्रतोद सुनील प्रभू यांनी नवनिर्वाचित विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्याकडे केली होती.

शिवसेनेच्या ३९ आमदारांनी व्हिपच्या विरोधात मतदान केलं. याच पार्श्वभूमीवर ३९ आमदारांच्या निलंबनाची याचिका आम्ही विधानसभा अध्यक्षांकडे दाखल केली आहे. संबंधित आमदारांवर अपात्रतेची कारवाई करावी, अशी मागणी आम्ही विधानसभा अध्यक्षांकडे केली आहे, अशी माहिती शिवसेना खासदार अरविंद सावंत यांनी पत्रकार परिषदेत दिली होती. त्यामुळे आता यापुढे काय घडामोडी होतात हे पहावं लागणार आहे.