TOD Marathi

मुंबई : तब्बल ७० वर्षांनी भारतात चित्ते (Cheetah) परतले आहेत. आफ्रिकेमधील नामीबियावरून (Namibia Africa) आठ चित्ते शनिवारी भारतात आणण्यात आले. शनिवारी १७ सप्टेंबरला नामीबियावरून ८ चित्यांची पहिली बॅच भारतात दाखल झाली आहे. भारताच्या माजी पंतप्रधान इंदिरा गांधी (Indira Gandhi) यांनी हा प्रोजेक्ट सुरू केला होता. मात्र हा पूर्ण होण्यामध्ये बरेच अडथळे आले. त्यानंतर आता सत्तर वर्षानंतर भारताच्या जमिनीवर चित्यांचं पुनरागमन झाला आहे. १६ चित्ते भारतात आणायचे आहेत. त्यापैकी ८ चित्यांची पहिली बॅच पंतप्रधान मोदी (Narendra Modi) यांच्या वाढदिवसाच्या दिवशी भारतात दाखल झाली आहे. मात्र आता नामिबियातून आणलेल्या चित्त्यांवरून केंद्र सराकरमधील भाजपविरोधात राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन नेत्यांनी तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांनी चित्त्यांना देण्यात येणाऱ्या आहारावरून प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे. चित्त्यांना (Cheetah) खाण्यासाठी जिवंत काळवीट सोडणं ही क्रूरता असल्याचं त्यांनी म्हटलं. इतर प्राणी संग्रहालयात जो आहार दिला जातो, तोच द्यायला पाहिजे… चित्त्यांना (Cheetah) खाण्यासाठी जिवंत काळवीट सोडणं ही क्रूरता असल्याचं त्यांनी म्हटलं. इतर प्राणी संग्रहालयात जो आहार दिला जातो, तोच द्यायला पाहिजे… असे मत जयंत पाटील यांनी मांडलं. तर अजित पवार (Ajit Pawar) यांनीही यावरून केंद्र सरकारवर टीका केली.

तर, बऱ्याचदा दुर्दैवाने, महाराष्ट्रात जे महत्त्वाचे प्रश्न असतात, याला व्यवस्थित बाजूला ठेवून तिसरेच प्रश्न पुढे आणतात. चित्ते आले ठिक आहे… पण यातून रोजीरोटीचा प्रश्न सुटणार आहे का, याऐवजी वेदांताचा प्रश्न सुटतील का, असा सवाल अजित पवार यांनी केला.