TOD Marathi

मुंबई : राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक आणि अनिल देशमुखांना राज्यसभेच्या निवडणुकीत मतदानाचा हक्क बजावण्यासाठी परवानगी द्यावी, अशी मागणी करणार आहोत, अशी माहिती उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे. मागील काळामध्येही अशा प्रकारच्या घटना घडल्या असल्याचंही त्यांनी यावेळेस सांगितलं.

पत्रकार परिषदेत बोलताना पवार म्हणाले की, रमेश कदम आणि छगन भुजबळ यांनाही अशा प्रकारची परवानगी मिळाली होती. प्रयत्न करणं आमच्या हातामध्ये आहे,तो आम्ही कसोशीने करण्याचा प्रयत्न करणार आहोत.

तसेच नवाब मलिक आणि अनिल देशमुख यांना राज्यसभा निवडणुकीत मतदान देण्याचा हक्क मिळावा यासाठी न्यायालयात जाण्याची तयारी आम्ही दाखवणार आहोत, असंही पवारांनी यावेळी सांगितलं.