TOD Marathi

महाविकास आघाडी सरकारच्या काळात शिवसेना ठाकरे गटाविरोधात सातत्याने आक्रमक भूमिका घेणाऱ्या अमरावतीच्या खासदार नवनीत राणा अडचणीत आल्या आहेत. (Navneet Rana is in trouble in caste certificate case) बोगस जात प्रमाणपत्र दिल्याप्रकरणी त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. याप्रकरणी शिवडी कोर्टात सुनावणी सुरू होती. या सुनावणीवर शिवडी कोर्टाने बोगस जात प्रमाणपत्र प्रकरणी नवनीत राणा यांच्या विरोधात अजामीनपात्र वॉरंट काढण्याचे निर्देश मुलुंड पोलिसांना दिले आहेत. त्यामुळे आता नवनीत राणा यांना अटक होण्याची दाट शक्यता आहे. 2019 मध्ये लोकसभा निवडणूक (2019 Loksabha election) राखीव कोट्यातून लढवण्यासाठी खासदार नवनीत राणा यांनी बोगस कागदपत्र तयार करून अनुसूचित जातीचे प्रमाणपत्र मिळवल्याचा आरोप आहे. या संदर्भात प्रकरणात नवनीत राणा आणि त्यांच्या वडिलांविरोधात मुलुंड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली होती. त्यानंतर नवनीत राणा आणि त्यांच्या वडिलांवर गुन्हा देखील दाखल करण्यात आला आहे.

गेल्या काही महिन्यांपासून हे प्रकरण न्यायालयात आहे. मात्र, आता शिवडी कोर्टाने नवनीत राणा यांच्या विरोधात अजामीनपात्र वॉरंट काढल्याने त्यांच्या अडचणी वाढल्या आहेत. शिवडी कोर्टाच्या आदेशानंतर नवनीत राणा यांनी तातडीने सत्र न्यायालयात धाव घेत या निर्णयाला आव्हान दिले आहे. (Navneet Rana went to Session court against the decision by Shivdi court) मात्र, सत्र न्यायालयाने कारवाईला स्थगिती दिलेली नाही. त्यामुळे शिवडी कोर्टाच्या आदेशाची अंमलबजावणी झाल्यास नवनीत राणा यांना अटक होण्याची शक्यता आहे.

या प्रकरणातील तक्रारदार जयंत वंजारी यांच्या वकिलांनी पोलिसांच्या भूमिकेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत. सत्र, न्यायालयाने शिवडी कोर्टाचा अजामीनपात्र अटक वॉरंटला स्थगिती दिलेली नाही, असं असतानाही पोलीस न्यायालयाच्या आदेशाची अंमलबजावणी का करत नाही, असा प्रश्न जयंत वंजारी यांच्या वकिलांनी उपस्थित केला आहे.

सदर प्रकरणात शिवडी कोर्टात पुढील सुनावणी 7 नोव्हेंबर रोजी होणार आहे. तोपर्यंत पोलीस नवनीत राणा यांच्यावर काय कारवाई करतात हे पाहावे लागणार आहे.

Warning: Undefined array key "arrow_bg_color" in /home/kiftjbmy/public_html/todmarathi/wp-content/plugins/theplus_elementor_addon/modules/widgets/tp_dynamic_listing.php on line 7016

Warning: Undefined array key "arrow_icon_color" in /home/kiftjbmy/public_html/todmarathi/wp-content/plugins/theplus_elementor_addon/modules/widgets/tp_dynamic_listing.php on line 7017

Warning: Undefined array key "arrow_hover_bg_color" in /home/kiftjbmy/public_html/todmarathi/wp-content/plugins/theplus_elementor_addon/modules/widgets/tp_dynamic_listing.php on line 7018

Warning: Undefined array key "arrow_hover_icon_color" in /home/kiftjbmy/public_html/todmarathi/wp-content/plugins/theplus_elementor_addon/modules/widgets/tp_dynamic_listing.php on line 7019

Tags

वेब स्टोरीज