नाशिक: नाशिकमध्ये अपघातानंतर ( Nashik bus accident ) खासगी बसने अचानक पेट घेतल्यानंतर मोठी दुर्घटना घडली आहे. या अपघातामध्ये प्रवाशांचा होरपळून मृत्यू झाला आहे तर काही जण जखमी असल्याची माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ( CM Ekanath Shinde ) यांनी दिली आहे.
जखमींवर तातडीने उपचार करण्याच्या सूचना देण्यात आल्या असून खासगी रुग्णालयातूनही मदतीच्या सूचना दिल्या आहेत. महापौर घटनास्थळी आहेत. जिल्हाधिकाऱ्यांशी बोललो. या अपघाताची चौकशी केली जाईल. सध्या जखमींना मदत करण्यास प्राधान्य दिले आहे. सर्व उपचार शासनाच्या वतीने केला जाईल तर मृतांच्या कुटुंबियांना ५ लाख रुपये देण्यात येईल’ अशी घोषणा एकनाथ शिंदे यांनी केली आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अपघात स्थळाला भेट दिली, त्याचबरोबर जखमींवर सुरू असलेल्या रुग्णालयात देखील भेट दिली आणि त्यांच्याशी संवाद साधला, त्यांची विचारपूस केली. यावेळी मुख्यमंत्र्यांसोबत मंत्री गिरीश महाजन ( Minister Girish Mahajan ) , दादा भुसे ( Dada Bhuse ) यांच्यासह वरिष्ठ अधिकारी आणि स्थानिक लोकप्रतिनिधी उपस्थित होते.