Deprecated: Creation of dynamic property Theplus_Elementor_Plugin_Options::$fields is deprecated in /home/kiftjbmy/public_html/todmarathi/wp-content/plugins/theplus_elementor_addon/includes/theplus_options.php on line 66

Deprecated: Creation of dynamic property Plus_Generator::$transient_extensions is deprecated in /home/kiftjbmy/public_html/todmarathi/wp-content/plugins/theplus_elementor_addon/modules/enqueue/plus-generator.php on line 873
पुन्हा एक ठाकरे राजकारणात?

TOD Marathi

पुन्हा एक ठाकरे राजकारणात?

संबंधित बातम्या

No Post Found

दसरा मेळाव्याच्या निमित्ताने पहिल्यांदाच शिवसेनेचे दोन मेळावे झाले. शिवसेना कुणाची हा संघर्ष सुप्रीम कोर्टात गेला, त्यानंतर सुप्रीम कोर्टाने निवडणूक आयोगाला याबाबत निर्णय घेण्याच्या सूचना दिल्या. या पार्श्वभूमीवर दोन दसरा मेळावे घेण्यात आले. शिवाजी पार्क मैदानावर उद्धव ठाकरेंनी दसरा मेळावा घेतला तर बीकेसी मैदानावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Chief Minister Eknath Shinde) यांनी दसरा मेळावा घेतला. दोघांच्याही दसरा मेळाव्याला मुख्य भाषण हे त्यांचे होणार होतेच मात्र, त्या व्यतिरिक्त या दसरा मेळाव्याला आणखी कोण कोण हजेरी लावतात याकडे सगळ्यांचे लक्ष लागलेलं होतं. शिवसेनेचे 40 आमदार आणि 12 खासदार हे आधीच एकनाथ शिंदेंच्या सोबत असताना आणखी काही आमदार किंवा खासदार एकनाथ शिंदे गटात जातात का? अशी शक्यता वर्तवण्यात आली होती. शिंदे गटाचे खासदार कृपाल तुमाने यांनी याबाबत एक वक्तव्य देखील केलं होतं मात्र कुठलेही आमदार किंवा खासदार हे त्या दिवशी शिंदे गटात गेले नाहीत. याउलट लीलाधर डाके ( Liladhar Dake ), गजानन कीर्तिकर ( Gajanan Kirtikar ) हे ज्येष्ठ नेते उद्धव ठाकरेंच्या दसरा मेळाव्याला प्रामुख्याने उपस्थित होते.

दसरा मेळाव्यात दोन्ही बाजूंनी एकमेकांवर वार-पलटवार करण्यात आले. मात्र दोन्ही मेळाव्यात उपस्थिती चर्चेत राहिली ती ठाकरे घराण्यातील सदस्यांची.

एकनाथ शिंदे यांच्या दसरा मेळाव्यात जयदेव ठाकरे ( Jaydev Thackeray ), स्मिता ठाकरे ( Smita Thackeray ) यांची उपस्थिती होती. जयदेव ठाकरे यांनी या मेळाव्यात भाषण देखील केलं. एकनाथ शिंदे यांना एकटा नाथ होऊ देऊ नका, अशा प्रकारची भावनिक सादही त्यांनी घातली. मात्र, जयदेव ठाकरे यांचे पुत्र जयदीप ठाकरे यांनी आपल्या काकांच्या म्हणजे उद्धव ठाकरेंच्या दसरा मेळाव्याला उपस्थिती लावली होती.

जयदीप हे बाळासाहेब ठाकरे यांचे सर्वात मोठे नातू आहेत आणि आदित्य ठाकरेंचे ( Aditya Thackeray ) ते चुलतभाऊ आहेत. जयदीप ठाकरे यांचे वडील जयदेव ठाकरे हे शिंदे यांच्या मेळाव्यात तर जयदीप हे ठाकरेंच्या मेळाव्यात असं चित्र होतं. दसरा मेळावे पार पडल्यानंतर पहिल्यांदाच जयदीप ठाकरे यांनी एका वृत्तवाहिनीशी संवाद साधला. “जे झालं ते फार दुर्दैवी आहे, खरी शिवसेना कुणाची आहे, हे सर्वांनाच माहिती आहे. माझ्या काकांनी म्हणजे उद्धव ठाकरेंनी मला जर काही जबाबदारी दिली तर मी ती निश्चितपणे पार पाडेल. उद्धव काका, रश्मी काकी, आदित्य यांच्यासोबत मी संपर्कात असतो. पुन्हा मला उद्धव काकांची सविस्तर भेट घ्यायची आहे, दसरा मेळाव्याच्या दिवशी देखील आम्ही भेटलो मात्र फार सविस्तर बोलणं होऊ शकलं नाही. आदित्य चांगलं काम करतोय, यापुढे त्यांना माझी काही गरज लागली तर मी त्यांच्यासोबत असेल. त्यांनी माझ्यावर काही जबाबदारी दिली तर ती देखील मी यशस्वीपणे पार पाडेल.” असं त्यांनी म्हटलं आणि “कठीण काळात उद्धव ठाकरे यांना ही सगळी लोकं सोडून गेली” असं म्हणत अप्रत्यक्षपणे शिंदे गटावर निशाणा साधला. त्यामुळे पिता-पुत्रांची दोन वेगवेगळ्या मेळाव्यात असलेली ही उपस्थिती बरंच काही बोलून जाते. त्यामुळे आता आणखी एक ठाकरे जयदीप ठाकरे यांच्या रूपाने राजकारणात येणार का? अशा चर्चा सुरू आहेत.

Warning: Undefined array key "arrow_bg_color" in /home/kiftjbmy/public_html/todmarathi/wp-content/plugins/theplus_elementor_addon/modules/widgets/tp_dynamic_listing.php on line 7016

Warning: Undefined array key "arrow_icon_color" in /home/kiftjbmy/public_html/todmarathi/wp-content/plugins/theplus_elementor_addon/modules/widgets/tp_dynamic_listing.php on line 7017

Warning: Undefined array key "arrow_hover_bg_color" in /home/kiftjbmy/public_html/todmarathi/wp-content/plugins/theplus_elementor_addon/modules/widgets/tp_dynamic_listing.php on line 7018

Warning: Undefined array key "arrow_hover_icon_color" in /home/kiftjbmy/public_html/todmarathi/wp-content/plugins/theplus_elementor_addon/modules/widgets/tp_dynamic_listing.php on line 7019

Tags

वेब स्टोरीज