नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची आज पंजाबमधील फिरोजपूर येथे सभा आयोजित करण्यात आली होती. मात्र, सुरक्षा यंत्रणेतील अडचणींमुळे ही सभा अचानक रद्द करण्यात आली आहे. कार्यक्रमस्थळी जाणाऱ्या पंतप्रधानांचा ताफा एका उड्डाणपुलावर सुमारे 15 ते 20 मिनिटे अडकून पडला होता. सुरक्षेमुळे पंतप्रधान मोदींना पुन्हा भटिंडा विमानतळावर नेण्याचा निर्णय घेण्यात आला. तिथे पोहोचल्यावर या साऱ्या घटनाक्रमावर मोदी अधिकाऱ्यांना काय म्हणाले, याबाबतची माहिती एएनआय या वृत्तसंस्थेने दिली आहे.
भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांनीही याबाबत प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी ट्विट करत म्हटलंय की, “मतदारांच्या हातून पराभवाच्या भीतीने, पंजाबमधील काँग्रेस सरकारने पंजाबमधील पंतप्रधान मोदीजींच्या कार्यक्रमांना हाणून पाडण्यासाठी शक्य त्या सर्व संभाव्य युक्त्या वापरल्या.”सुरक्षेत कोणतीही अडचण नव्हती: पंजाबचे मुख्यमंत्री यांनी पंजाब काँग्रेसने हे आरोप धुडकावून लावले आहेत. एका पंजाबी वाहिनीवरील टीव्ही मुलाखतीत या घटनेवर प्रतिक्रिया देताना पंजाबचे मुख्यमंत्री चरणजीत चन्नी यांनी म्हटलंय की, “सुरक्षेत कोणतीही चूक नव्हती. पंतप्रधान ज्या रस्त्यावरून जाणार होते त्याबाबतच्या आराखड्याची योजना शेवटच्या क्षणी बनवण्यात आली. तर त्यांना हेलिकॉप्टरने जायचे होते. त्यांच्या रॅलीच्या सुरक्षा व्यवस्थेवर मी रात्री उशिरापर्यंत काम करत होतो. पंतप्रधानांच्या रॅलीसाठी 70,000 खुर्च्या लावण्यात आल्या होत्या पण फक्त 700 लोक आले होते.