TOD Marathi

पुणे – अनाथ मुलांसाठी आयुष्य वेचणा-या पद्मश्री पुरस्कारप्राप्त, ज्येष्ठ समाज सेविका सिंधूताई सपकाळ यांचे आज सायंकाळी 8 वाजून 10 मिनिटांनी पुण्यातील गॅलक्झी हॉस्पिटलमध्ये ह्रदयविकाराच्या झटक्याने निधन झाले.
सिंधुताई या 75 वर्षांच्या होत्या, महिना भरापूर्वी त्यांचे हर्नियाचे ऑपरेशन झाले होते. त्यांनंतर त्यांच्यावर उपचार सुरु होते. आज अखेर ह्रदयविकाराच्या झटक्याने त्यांचे निधन झाले.
अनाथांसाठी सेवाकार्य करणाऱ्या भारतीय समाज सेविका सिंधुताई सपकाळ त्या अनेक दिवसांपासून पुण्यातील खासगी रुग्णालयात उपचार घेत होत्या. सिंधूताई यांचे मांजरी येथील पुनर्वसन केंद्रात अनेक अनाथ मुले राहत आहेत. त्यांच्या जाण्याने ही अनाथ मुले पोरकी झाली आहेत. सिंधूताई या माई नावाने परिचित होत्या.
त्यांनी अनेक खडतर प्रसंगाना तोंड देत हजारों अनाथ मुलांचा सांभाळ केला आहे. त्यांना 2012 साली डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाज भूषण पुरस्कार मिळाला होता तर 2021 साली त्यांना पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं होतं.