TOD Marathi

टिओडी मराठी, नवी दिल्ली, दि. 15 जुलै 2021 – मागील काही काळात केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारने सार्वजनिक क्षेत्रातील काही कंपन्या तसेच मालमत्तांची विक्री करून पैसे उभारण्यास सुरुवात केली. या दरम्यान, आता भारतीय रेल्वेने निधी उभारण्यासाठी हावडा रेल्वे स्टेशनजवळ असलेल्या प्राइम लँडला ९९ वर्षांच्या लीजवर देण्याची योजना आखलीय.

रेल्वेच्या अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार लीजवर घेतल्यानंतर या प्राइम लँडचा निवासी व व्यावसायिक अशा दोन्ही प्रकारे वापर करता येणार आहे. हुगळी नदीजवळ असलेल्या ८८ हजार ३०० चौरस मीटर जागेची किंमत ४४८ कोटी रुपये एवढी निश्चित केली आहे. रेल्वे भूमी विकास प्राधिकरणने या जमिनी लीजवर देण्यासाठी बोली आमंत्रित केल्यात.

याबाबत रेल्वेच्या अधिकाऱ्याने सांगितले की, हि जमीन हावडा रेल्वे स्टेशनपासून १.५ किमी अंतरावर असून हि जमीन २० मीटर रुंद असलेल्या महामार्गाच्या दोन्ही बाजूला आहे. तसेच प्री-बिड मीटिंगमध्ये स्थानिक डेव्हलपर्सची प्रतिक्रिया उत्साह वाढवणारी आहे. इच्छुक डेव्हलपर्स २९ ऑगस्ट २०२१ पर्यंत आपल्या बोली लावतील.

आरएलडीए विभाग रेल्वे मंत्रालयाच्या अंतर्गत काम करत असून या विभागाचे काम रेल्वेच्या जमिनींचा विकास करणे हेच आहे. याची चार प्रमुख कामे म्हणजे व्यावसायिक प्रॉपर्टीला लीजवर देणे, रेल्वे कॉलनीचे रि-डेव्हलपमेंट, स्टेशनचे रीडेव्हलपमेंट आणि इतर अनेक प्रकारच्या वापरासाठी लागणाऱ्या कॉम्प्लेक्सची निर्मिती करणे, असे आहे.

याबाबत आरएलडीएचे उपाध्यक्ष वेद प्रकाश डुडेजा यांनी सांगितले की, या जमिनीचा व्यावसायिक व निवासी अशा दोन्हींसाठी वापर केला जाईल. त्याशिवाय तिथे वॉटर स्पोर्ट्सची सुविधाही तयार केली जाईल.

जमीन उत्तरेमध्ये गोलाबाडी घाट आणि रत्नाकर स्कूल, दक्षिणेमध्ये रिग्नल वर्कशॉप आणि रेल्वे प्रिंटिंग प्रेस, पूर्वेकडे हुगळी नदी आणि पश्चिमेकडे साल्किया स्कूल रोड या सर्वांच्या मध्यभागी आहे.

बोली जिंकणाऱ्या कंपनीला जमिनीवर १० वर्षांच्या आत डेव्हलपमेंटचे काम पूर्ण करावे लागणार आहे. सध्या रेल्वेकडे देशात मिळून ४३ हजार हेक्टर एवढी जमीन वापराविना पडून आहे.

आरएलडीए सध्या ८४ रेल्वे कॉलनींच्या पुनर्विकास प्रकल्पांची देखरेख करत आहे. सध्या आरएलडीएकडे देशात १०० कमर्शियल साइट्स आहेत. त्या लीजवर देण्याची तयारी सुरूय.

Warning: Undefined array key "arrow_bg_color" in /home/kiftjbmy/public_html/todmarathi/wp-content/plugins/theplus_elementor_addon/modules/widgets/tp_dynamic_listing.php on line 7016

Warning: Undefined array key "arrow_icon_color" in /home/kiftjbmy/public_html/todmarathi/wp-content/plugins/theplus_elementor_addon/modules/widgets/tp_dynamic_listing.php on line 7017

Warning: Undefined array key "arrow_hover_bg_color" in /home/kiftjbmy/public_html/todmarathi/wp-content/plugins/theplus_elementor_addon/modules/widgets/tp_dynamic_listing.php on line 7018

Warning: Undefined array key "arrow_hover_icon_color" in /home/kiftjbmy/public_html/todmarathi/wp-content/plugins/theplus_elementor_addon/modules/widgets/tp_dynamic_listing.php on line 7019

Tags

वेब स्टोरीज