TOD Marathi

मुंबई :
माजी खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी आज राज्यसभा निवडणुकीतून माघार घेतली आहे. मुंबईत पत्रकार परिषद घेवून त्यांनी याबाबतची घोषणा केली. दरम्यान ही माघार नाही, माझा स्वाभिमान आहे, असं संभाजीराजे छत्रपती यांनी यावेळी स्पष्ट केलं. यावेळी बोलताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिलेला शब्द मोडल्याचा आरोपही केला.

असे असताना दुसऱ्या बाजूला महाविकास आघाडीतील घटकपक्ष असलेल्या काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे. “संभाजीराजे खासदार झाले नाहीत हे खरंच दुर्दैवी आहे, परंतु काँग्रेसचा त्यांना नेहमीच पाठिंबा राहील,” अशी प्रतिक्रिया नाना पटोले यांनी दिली आहे.

नाना पटोले म्हणाले, इतर पक्षांचे माहित नाही, परंतु संभाजीराजे राज्यसभेत जावे अशी कॉंग्रेसची मनापासूनची इच्छा होती. महाराष्ट्राच्या नेतृत्वाची वेगळी शान त्यांच्या नेतृत्वामुळे होती. ते खासदार झाले नाहीत हे खरंच दुर्देवी! परंतु काँग्रेसचा त्यांना नेहमीच पाठिबा राहिलं, असही नाना पटोले म्हणाले.