0 ते 20 पटसंख्या असलेल्या शाळांची माहिती शिक्षण विभागाने मागवली. ही माहिती मागवणे म्हणजे त्या शाळा बंद करण्याचे एक प्रकारे संकेत आहेत. या गोष्टीला सर्व स्तरातून विरोध होत आहे. जर असं झालं तर अनेक ग्रामीण भागातील, दुर्गम भागातील विद्यार्थ्यांचा शिक्षणाचा मोठा प्रश्न निर्माण होईल. (Education of rural area) काही संघटनांनी देखील याचा विरोध केला. यासंबंधीचं वृत्त एका वृत्तपत्रात छापून आलं. त्या वृत्तपत्राचे कात्रण सोशल मीडियावर पोस्ट करत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधला आहे. (Nana Patole criticized CM Ekanath Shinde) ‘खुर्च्या रिकाम्या झाल्या तरी भाषण करणार पण पटसंख्या कमी झाली तर शाळा बंद करणार’ असं कॅप्शन देत त्यांनी जोरदार हल्ला चढवला आहे.
दसरा मेळाव्याच्या निमित्ताने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बीकेसी मैदानावर भाषण केलं. यावेळी मागची लोकं उठून जात असतानाचे व्हिडिओ व्हायरल झाले होते, (BKC Ground Dasra Melava Viral Video) याचा अप्रत्यक्ष संदर्भ देत नाना पटोले यांनी मुख्यमंत्र्यांवर टीका केली आहे. राज्यात दोन्ही दसरा मेळाव्यांची मोठी चर्चा होती. शिवाजी पार्क मैदानावर उद्धव ठाकरेंचा (Uddhav Thackeray Dasara Melava in Shivaji Park) मेळावा तर बीकेसी मैदानावर एकनाथ शिंदे यांचा मेळावा हा चर्चेचा विषय होता. अपेक्षेप्रमाणे दोन्ही बाजूंनी एकमेकांवर तोफ डागण्यात आली. त्यानंतर दोघांच्या भाषणावर विविध नेत्यांच्या प्रतिक्रिया देखील आल्या. या सर्व प्रतिक्रियांच्या दरम्यान नाना पटोले यांनी मात्र मुख्यमंत्र्यांवर टीका केली.
महाविकास आघाडी सरकार अस्तित्वात असताना काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना आणि मित्र पक्षांचं सरकार होतं ज्याचं नेतृत्व मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरे करत होते. (Mahavikas Aghadi government lead by Uddhav Thackeray) सरकार गेल्यानंतरही काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना यांच्यामध्ये कायमच एकजूट पाहायला मिळाली. मात्र, महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये नगरविकास मंत्री असलेले एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेच्या 40 आमदारांना सोबत घेऊन जात भाजपच्या मदतीने सरकार बनवलं. त्यानंतर एकनाथ शिंदे यांच्यावर मात्र महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून सातत्याने टीका होत आहे.
त्यातच दसरा मेळाव्याच्या निमित्ताने एका बाजूला उद्धव ठाकरे तर दुसऱ्या बाजूला एकनाथ शिंदे भाषण करणार होते. या दोघांच्या भाषणाकडे राजकीय वर्तुळाचं लक्ष नसेल तर नवलच. दोघांचीही भाषणे झाल्यानंतर अनेक नेतेमंडळींनी आपापल्या प्रतिक्रिया दिलेल्या आहेत.