राज्याचे लक्ष लागून राहिलेल्या सर्वच दसरा मेळावे पार पडले. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांचा दसरा मेळावा (Dasara Melava) शिवाजी पार्कवरील मैदानात पार पडला तर एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांचा गट मेळावा बीकेसी मैदानावर (BKC Ground) पार पडला. महाराष्ट्र पोलिसांच्या अंदाजानुसार उद्धव ठाकरेंच्या मेळाव्यात एक लाख तर एकनाथ शिंदे यांच्या मेळाव्यात दोन लाख लोक उपस्थित होते. दोन्ही गटांच्या समर्थकांच्या अपेक्षानुसार मोठ्या प्रमाणावर दसरा मेळाव्याला गर्दी झाली होती, शिवाजी पार्कवर उद्धव ठाकरे यांनी तर बीकेसी मैदानावर एकनाथ शिंदेंनी उपस्थितांना मार्गदर्शन केलं. मुंबईतील आवाज फाउंडेशननं मात्र कुणाचा आवाज सर्वाधिक होता याची माहिती प्रसिद्ध केली आहे. या फाउंडेशनच्या नोंदीनुसार सर्वाधिक आवाज हा उद्धव ठाकरेंच्या मेळाव्यात होता. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंपेक्षा उद्धव ठाकरे यांच्या सभेला आवाज सर्वाधिक होता, असा निष्कर्ष आवाज फाउंडेशनने (Awaj Foundation) काढला आणि याबाबत त्यांनी एक अहवालही जारी केला आहे.
शिवाजी पार्कवरील दसरा मेळाव्यात वाद्यांचा आवाज ८०.३ ते १०१.६ डेसिबल पर्यंत पोहोचला होता. शिवसेना गीत वाजवण्यात आलं त्यावेळी त्याचा आवाज ८६.५ डेसिबल ९१.३ डेसिबल आवाज होता. किशोरी पेडणेकर यांच्या भाषणाच्या वेळी आवाज ८४.६ ते ९७ डेसिबल पर्यंत पोहोचला होता. नितीन देशमुख यांच्या भाषणावेळी मैदानाबाहेर ढोल वाजवले जात असल्यानं त्यांचं भाषण उपस्थितांना ऐकू जात नव्हतं. देशमुखांच्या आवाजावेळी ८८.७ ते ९३.५ डेसिबल आवाज होता. तर, मैदानाबाहेरी आवाज ९३.५ डेसिबल होता. अंबादास दानवे ८७.४ ते ९६.६, सुभाष देसाई ८७.९ ते ९३.१, सुषमा अंधारे ७७.६ ते ९३.६, भास्कर जाधव ७५.४ ते ९२.१, उद्धव ठाकरेंच्या भाषणाचा आवाज ६८.६ ते ८८.४ डेसिबल होता. शिवसेना गीताचा आवाज ८० ते ८६.२ डेसिबल होता.
शिवसेनेच्या शिवाजी पार्कवरील मेळाव्यात मैदानाबाहेर ढोल ताशांचा आवाज १०१.६ डेसिबल इतका होता. किशोरी पेडणेकर यांच्या भाषणावेळी आवाज सर्वाधिक होता.
एकनाथ शिंदे यांच्या मेळाव्यात किरण पावस्कर यांच्या वेळी आवाज ७८.७ ते ८८.५ डेसिबल पर्यंत पोहोचला होता. शहाजी पाटील यांच्या भाषणावेळी ८२.४, राहूल शेवाळे ७८.८, धैर्यशील माने ८८.५, भावना गवळी ८३.९, शरद पोंक्षे ८२.८, गुलाबराव पाटील ८१.१ ते ८६, रामदास कदम ८२.२ डेसिबल तर एकनाथ शिंदे यांच्या भाषणावेळी आवाज ८३.५ ते ८९.६ डेसिबल पर्यंत पोहोचला होता.