TOD Marathi

टिओडी मराठी, मुंबई, दि. 5 ऑगस्ट 2021 – पुढील सहा महिन्यांत महानगरपालिकेच्या निवडणुका लागणार आहेत. त्यामुळे सर्व कार्यकर्त्यांनी कामाला लागावे. निवडणुकीची जोरदार तयारी करा, असे आदेश मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी पक्षाच्या कार्यकर्त्यांना दिले. कळवा – मुंब्रा परिसरामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या एका कार्यक्रमात ते बोलत होते.

यंदाच्या अतिवृष्टीचा फटका राज्याच्या अनेक भागात बसला आहे. त्यामुळे नुकसानग्रस्त भागात तसेच पूरग्रस्त भागात नेत्यांनी दौरे करून तेथील झालेली वाताहत पाहिली आहे.

याच पूरपरिस्थितीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी आपला वाढदिवस साजरा न करण्याचा निर्णय घेतलाय.तसेच आपण कोणत्याही कार्यक्रमाला उपस्थित राहणार नाही आणि कोणत्याही कार्यकर्त्याची भेट घेणार नाही.

तर आपण देवासमोर राज्यात पुन्हा असं संकट येऊ देऊ नको, अशी प्रार्थना करणार आहे, असे त्यांनी म्हंटले. मुंब्र्यातील पक्षाच्या एका कार्यक्रमानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला, यावेळी ते बोलत होते.

मंत्री जितेंद्र आव्हाड यांचा मतदारसंघ असलेल्या कळवा – मुंब्रा परिसरामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अनेक पदांच्या नियुक्त्या केल्या. या कार्यक्रमात जितेंद्र आव्हाड म्हणाले, पुढील सहा महिन्यांत महानगरपालिकेच्या निवडणुका लागणार आहेत. त्यामुळे सर्व कार्यकर्त्यांनी कामाला लागावे.

निवडणुकीची जोरदार तयारी करा. केवळ 180 दिवस आपल्याकडे शिल्लक राहिले आहेत. आपण केलेल्या कामाच्या बदल्यात लोकांकडून मत मागा, असे त्यांनी कार्यकर्त्यांना सांगितले.

दरम्यान, कार्यक्रमात उपस्थित असलेल्या लोकांनी मास्क लावला नाही, म्हणून मंत्री आव्हाड यांनी त्यांना फटकारले.