मुंबई: कोरोना महामारीमुळे लांबणीवर पडलेल्या परीक्षांच्या तारखा अखेर जाहीर करण्यात आल्या आहेत. आयोगामार्फत आता २९० पदांसाठी १७ संवर्गात भरती केली जाणार आहे. तसेच, याबाबतची विस्तृत माहिती आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आलेली आहे.
राज्यसेवांच्या या परीक्षासंदर्भात आयोगाने ट्विटद्वारे माहिती दिली असून, त्यानुसार २ जानेवारी २०२२ रोजी राज्यसेवा पूर्व परीक्षा आयोजित करण्यात आल्याचे सांगण्यात आले आहे. राज्यभरातील ३७ जिल्हा केंद्रांवर ही परीक्षा घेण्यात येणार आहे.
राज्यसेवा पूर्व परीक्षा 2021 ची जाहिरात आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे. पूर्व परीक्षा दिनांक 2 जानेवारी, 2022 रोजी व मुख्य परीक्षा दिनांक 7, 8 व 9 मे, 2022 रोजी आयोजित करण्यात येईल. https://t.co/XnX063nev0
— Maharashtra Public Service Commission (@mpsc_office) October 4, 2021
या परीक्षेसाठी परीक्षार्थ्यांना उद्या (५ ऑक्टोबर) दुपारी दोन वाजेपासून अर्ज करता येणार आहे. तर, अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख २५ ऑक्टोबर आहे. पूर्व परीक्षेच्या निकाला आधारे मुख्य परीक्षेसाठी पात्र ठरलेल्या उमेदवारांच्या परीक्षा ७, ८ व ९ मे २०२२ रोजी आयोजजीत करण्यात आल्या आहेत.