TOD Marathi

मुंबई: एनसीबीने अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यनसह आठ जणांना प्रवासी जहाजावर अमली पदार्थ घेऊन गेल्याप्रकरणी रविवारी अटक केली होती. या प्रकरणी किल्ला कोर्टात सुनावणी झाली असून आता आर्यनसह मुनमुन व अरबाज या दोघांना देखील सात ऑक्टोबरपर्यंत एनसीबी कोठडी सुनावली गेली आहे.

आर्यन खानकडून वकील सतीश मानशिंदे यांनी बाजू मांडली. तर दुसरीकडे, अतिरिक्त सॉलिसिटर जनरल अनिल सिंह हे एनसीबीकडून बाजू मांडली. तर, आर्यन खानच्या मोबाईलमध्ये काही आक्षेपार्ह व धक्कादायक फोटो स्वरूपातील माहिती आढळल्याचे समोर आल्याने, त्याच्या कोठडीत ११ ऑक्टोबरपर्यंत वाढ केली जावी. अशी मागणी यावेळी एनसीबीकडून करण्यात आली होती.

आर्यनच्या फोन चॅटमध्ये बऱ्याच गंभीर स्वरूपातील लिंक आढळून आल्या आहेत, ज्यांचा संबंध आंतरराष्ट्रीय ड्रग्ज रॅकेटशी देखील लागण्याची शक्यता वर्तवली जात आहे. अखेर आर्यन खानला बेल मिळण्याऐवजी जेल होणार असून