TOD Marathi

खासदार राजन विचारे यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. गुरुपौर्णिमेच्या दिवशी शिवसेनेचे खासदार, आमदार, नेते, पदाधिकारी, पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंच्या भेटीसाठी येत असतात. मात्र यावर्षी या भेटीगाठींना एक वेगळी पार्श्वभूमी आहे. (MP Rajan Vichare met Shivsena Chief Uddhav Thackeray) शिवसेनेतून आमदारांचा एक मोठा गट दूर गेलेला असून त्यांनी एकनाथ शिंदे (Ekanath Shinde) यांच्या नेतृत्वात भाजपसोबत सत्ता स्थापन केलेली आहे. त्यातच राजन विचारे आणि नवे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे एकाच जिल्ह्यातून लोकप्रतिनिधी आहेत. नुकतंच शिवसेनेने लोकसभेच्या प्रतोद पदावरून खासदार भावना गवळी यांना दूर करत राजन विचारे यांना त्या ठिकाणी स्थान दिलं. राजन विचारे हे उद्धव ठाकरेंच्या बाजूला असल्याचे हे स्पष्ट संकेत होते.

खासदार राजन विचारे यांनी या भेटीदरम्यान आमच्या सारख्या शिवसैनिकांची साथ कायम आपल्या सोबत असल्याबाबतची ग्वाही पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना दिली असल्याचं त्यांनी समाज माध्यमांमधून सांगितलं. सध्या शिवसेना आव्हानात्मक काळातून जात आहे, या आव्हानात्मक काळात खासदार राजन विचारे यांनी घेतलेली भेट महत्त्वाची आहे. (We are with you, MP Rajan Vichare assured Uddhav Thackeray)

आपल्या पोस्टमध्ये राजन विचारे म्हणतात,
आज गुरुपौर्णिमा निमित्त दरवर्षीप्रमाणे शिवसेनेचे पक्षप्रमुख आदरणीय श्री. उद्धव साहेब ठाकरे यांची आज मातोश्री निवासस्थानी सदिच्छा भेट घेतली. यावेळी सोबत ठाणे जिल्ह्यातील शिवसेना, युवा सेनेचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
आमच्या सारख्या शिवसैनिकांची साथ कायम आपल्या सोबत असल्याबाबत ग्वाही यावेळी साहेबांना दिली.