टिओडी मराठी, सातारा, दि. 17 ऑगस्ट 2021 – भाजपचे राज्यसभा खासदार छत्रपती उदयराजे भोसले यांना कोरोनाची लागण झाली आहे. पुण्यातील रुबी हॉस्पिटलमध्ये उदयनराजे भोसले यांच्यावर उपचार सुरु आहेत. दिल्लीतून परतल्यानंतर खासदार उदयनराजे यांना कोरोनाची लागण झाली होती. मागील ४ दिवसांपासून उदयनराजेंवर पुण्यातील हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु आहेत.
सातारा भाजपचे खासदार उदयनराजे भोसले कोरोनाबाधित झाले आहेत. त्यांना उपचारासाठी पुण्यातील रुबी हॉस्पिटलमध्ये दाखल केले असून त्यांची प्रकृती स्थिर आहे.
चार दिवसांपासून त्यांच्यावर उपचार सुरु असून खासदार उदयनराजे भोसले यांच्या मातोश्री कल्पनाराजे भोसले या देखील कोरोना बाधित झाल्या होत्या. त्यांच्यावर देखील उपचार सुरु होते.
कोरोनाची लागण झाल्यामुळे उदयनराजे भोसले अधिवेशन सोडून परतले होते. त्यांच्या प्रकृती आता ठीक आहे. मात्र, दरम्यानच्या काळात उदयनराजे भोसले यांना कोरोना झाल्याचे निदान झाले आहे. येत्या दोन दिवसानंतर त्यांना डिस्चार्ज मिळणार आहे, असे त्यांच्या निवटवर्तीयांकडून सांगितले आहे.
उदयनराजे भोसले यांनी कोरोनाच्या काळात दुकाने सुरु करावीत. तसेच लोकांची विनाकारण अडवणूक करु नये, यासाठी भीक मांगो आंदोलन केले होते. कोरोनाच्या काळामध्ये प्रशासनाने घेतलेल्या भूमिकेलाही त्यांनी विरोध केला होता.