टीओडी मराठी, नवी दिल्ली, दि. 15 मे 2021 – लोकांनी निवडून दिलेले लोकप्रिनिधींनी सल्ला, उपदेश, सूचना आणि आदेश देण्याऐवजी जेव्हा कृती करतात तेव्हा खरं म्हणजे ‘नेता असावा तर असा’, असं वाटतं. याचा प्रत्यय मिझोरमच्या एका कोरोनाग्रस्त मंत्र्यांनी करून दिलाय, तेही या कोरोना काळात.
सध्या देश कोरोनाचा सामना करत आहे. अशा वेळी अनेक मंत्री लोकांच्या चुका दाखविण्यात आणि राजकारण करण्यात मग्न असतात. तर, काही जनतेचं लक्ष दुसरीकडे वळवून दिशाभूल करण्यावर भर देतात. म्हणून लोकप्रिनिधींनीविषयी लोकांच्या मनात चीड निर्माण होते. मात्र, मिझोरामच्या ऊर्जामंत्री आर. लालझिरलियाना या मंत्र्यानी मात्र लोकांची मनं जिंकली.
मिझोरम राज्याचे ऊर्जामंत्री आर. लालझिरलियाना हे कोरोना पॉझिटिव्ह असून देखील रुग्णालयातील कोविड वॉर्डमध्ये सेवा करत आहेत. लालझिरलियाना यांना 11 मे रोजी कोरोना विषाणूची लागण झाली. उपचारासाठी त्यांना रुग्णालयात दाखल केलं. त्यांच्या पत्नीला हि कोरोनाची लागण झाली. आधी ते दोघेही होम आयसोलेशनमध्ये होते. मात्र, त्यानंतर ऑक्सिजन लेव्हल कमी झाल्याने लालझिरलियाना यांना रुग्णालयात दाखल केलं.
यावेळी लालझिरलियाना रुग्णालयात सेवा करत असून लादी पुसताना दिसताहेत. त्यांचा हा फोटो सोशल मीडियावर कमी वेळात जोरात व्हायरल झालाय.
“आम्ही ज्या वॉर्डमध्ये आहोत, तो वॉर्ड खराब होता. मी साफसफाई करण्यासाठी फोन करण्यासाठी सफाई कर्मचाऱ्याला बोलावलं होतं. मात्र, खूप वेळ झाला पण कोणीच आलं नाही. अशात मी आणखी वाट पाहत बसण्यापेक्षा स्वत: साफसफाई करायला सुरुवात केली. हे स्वच्छतेचं काम करून मला सफाई कर्मचारी अथवा प्रशासनाला खालीपणा दाखवण्याचा किंवा त्यांचा अपमान करण्याचा उद्देश नाही, तर हे एक सामान्य काम आहे. मी माझ्या घरी हि साफसफाई करतो. अशी इथे देखील करतो” अशी माहिती आर. लालझिरलियाना यांनी पीटीआयशी बोलताना दिलीय.
आपल्या कृतीतून त्यांनी मनं जिंकली असून त्यांचं भरभरून कौतुक होत आहे.