नवी दिल्ली: काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी कोरोनावरुन मोदी सरकारवर जोरदार टीका केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसाच्या दिवशी जर दोन कोटींपेक्षा अधिक लसीकरण होऊ शकतं तर रोज तसं लसीकरण का होत नाही, असा सवाळल त्यांनी एका लेखाच्या माध्यमातून उपस्थित केला आहे.
ऑक्सीजनसाठी तडफडणारे रुग्ण, बेसहारा लोकांचं दु:ख सरकार समजू शकलं नाही. कोरोनाच्या विरोधातील लढाईला मोदी सरकार इव्हेंट मॅनेजमेंटची संधी का समजत आहे? असा सवालही सोनिया गांधी यांनी केला आहे. पहिल्या लाटेनंतर दुसऱ्या लाटेचा सामना करण्यासाठी मोदी सरकारची तयारी नव्हती असंही त्यांनी म्हटलं आहे.
दुसरीकडे महागाईवरुन प्रियांका गांधी यांनी मोदी सरकारवर टीका केली आहे. प्रियांका गांधी यांनी ट्वीट करत म्हटलं आहे की, सणासुदीचा काळ आहे. महागाईनं सामान्य जनता त्रस्त आहे. निवडणुकीच्या वेळी जनता यांना माफ करणार नाही.