टिओडी मराठी, मुंबई 31 ऑगस्ट 2021 – कोरोनामुळे राज्य सरकारने दहीहंडी उत्सव साजरा करण्यास मनाई केली असतानाही याला भाजप, मनसेने याला विरोध केला आहे. आज ठाणे, मुंबईत दहीहंडी उत्सव साजरा करणार आहे, असे मनसेने सांगितले होते. यामुळे पोलिस बंदोबस्तत असूनही सारे निर्बंध झुगारून मनसेने ठाणे, मुंबईमध्ये पहाटेच्या सुमारास दहीहंड्या फोडल्या.
रात्री १२ वाजता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने ठाण्यामध्ये दहीहंडी फोडली. त्या कार्य़कर्त्यांना अटक झाली आहे. परंतु रात्री २ च्या सुमारास तात्काळ जामिनावर सुटका ही झाली आहे. हिंदू सणांसाठी आम्ही कितीही केसेस घेऊ, असे मनसेने म्हटले आहे.
कोरोनाचे नियम पायदळी तुडवत हंडी फोडली. यावेळी अभिजीत पानसे आणि अविनाश जाधव यांची पोलिसांबरोबर झटापट झाली. भगवती शाळेच्या मैदानात ही दहीहंडी फोडली. यावेळी 250 कार्यकर्ते होते.
आम्ही जे ठरवतो ते करतो, दहीहंडी उत्सव साजरा होणार, असे मनसेचे नेते अविनाश जाधव यांनी सांगितले होते. तसेच बाहेरील राज्यांतून आम्हाला फोन येत आहेत. महाराष्ट्रामध्ये दहिहंडी साजरी झाली पाहिजे, राज ठाकरेंनी ती करावी, अशी मागणी होते असेही जाधव यांनी सांगितले. तर अभिजित पानसे यांनी आम्ही मराठी सण साजरा करणार आहे, असे असे म्हटले होते.