शिवसेना आमदार नितीन देशमुख बेपत्ता असल्याची तक्रार त्यांच्या पत्नी प्रांजली देशमुख यांच्याकडून पोलिसांकडे दाखल करण्यात आली आहे. काल विधान परिषद निवडणुकीच्या मतदानानंतर सायंकाळी ६ वाजता मुंबईहून अकोल्याला येत असल्याचं सांगितल्यानंतर फोन बंद झाला, त्यानंतर कोणताही संपर्क झाला नाही. पुढे सकाळपर्यंत संपर्क न झाल्याने बेपत्ता असल्याची तक्रार दाखल करण्यात आली. (Wife of MLA Nitin Deshmukh files police complaint)
महाविकास आघाडी सरकारमधील घटकपक्ष असलेल्या शिवसेना पक्षाचे नितीन देशमुख हे बाळापूर मतदारसंघातील आमदार आहे. देशमुख हे काल रात्रीपासून नॉट रिचेबल आहेत, ते एकनाथ शिंदे (Ekanath Shinde not reachable) यांचे निकटवर्तीय समजले जातात. देशमुख यांचे भाजपच्याही काही नेत्यांशी चांगले संबंध आहेत. (Nitin Deshmukh MLA Shivsena)
गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील हे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या भेटीला पोहोचले आहेत. विधानसभा सदस्यांच्या पत्नीने दाखल केलेल्या तक्रारीची गंभीर दखल गंभीर दखल गृहखात्याने घेतली आहे. (HM Dilip Walse Patil meets CM Uddhav Thackeray) मुख्यमंत्र्यांशी चर्चा झाल्यानंतर दिलीप वळसे-पाटील माध्यमांशी काय बोलतात याकडे सर्वांचे लक्ष लागलं आहे.