TOD Marathi

राज्यसभा आणि विधानपरिषद निवडणुकीत (Rajyasabha election and MLC election in Maharashtra) भाजपनं यश मिळवल्यानंतर राजकीय घडामोडींना मोठा वेग आला आहे. प्रचंड मोठ्या उलथापालथी महाराष्ट्राच्या राजकारणात होतील का? (Maharashtra Politics) असं चित्र आहे. महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकारपुढं राजकीय संकट आहे. (Manavikas Aghadi) शिवसेनेचे निष्ठावंत नेते म्हणून ओळखले जाणारे शिवसेना नेते आणि मंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) हे सध्या नॉट रिचेबल आहेत. ते बंडाच्या तयारीत असल्याचं बोललं जात आहे. एकनाथ शिंदे यांच्यासोबत शिवसेनेचे काही आमदार देखील आहेत.

दरम्यान एकनाथ शिंदे यांनी ट्विट केलं असून
“आम्ही बाळासाहेबांचे कट्टर शिवसैनिक आहोत… बाळासाहेबांनी आम्हाला हिंदुत्वाची शिकवण दिली आहे. बाळासाहेबांचे विचार आणि धर्मवीर आनंद दिघे साहेबांची शिकवण यांच्याबाबत आम्ही सत्तेसाठी कधीही प्रतारणा केली नाही आणि करणार नाही”,
असं एकनाथ शिंदे आपल्या ट्वीटमध्ये म्हणाले आहेत.

नाराज असलेले एकनाथ शिंदे यांनी त्यांची भूमिका ट्विटमधून व्यक्त केली आहे. एकनाथ शिंदे यांनी ट्विट करत बाळासाहेब ठाकरे यांचे कट्टर शिवसैनिक असल्याचं म्हटलं आहे. बाळासाहेब ठाकरे यांनी आम्हाला हिंदुत्वाची शिकवण दिली आहे. बाळासाहेब ठाकरेंचे विचार आणि धर्मवीर आनंद दिघे साहेबांची शिकवण यांच्याबाबत आम्ही सत्तेसाठी कधीही प्रतारणा केली नाही आणि करणार नाही, असं एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे. मात्र त्यांच्या या ट्विटमध्ये कुठेही पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा उल्लेख नाही. त्यामुळे एकनाथ शिंदे यांना नक्की काय सुचवायचं आहे यावर आता चर्चांना उधाण आलं आहे. (Ekanath Shinde tweeted)

शिवसेनेचे एकनाथ शिंदे यांच्या या भूमिकेची किंबहुना बंडाची दखल घेत पक्षाने त्यांना विधिमंडळ गटनेते पदावरून काढलेलं आहे. मोठी कारवाई शिवसेनेने त्यांच्यावर केली आहे.