ठाकरे गटातील पदाधिकारी आमच्या शिंदे साहेबांबद्दल (Ekanath Shinde) पातळी सोडून बोलत असतील तर “चून चून के गिण गीण के मारे जायंगे, म्हणत शिंदे गटाचे बुलढाण्याचे आमदार संजय गायकवाड यांनी पुन्हा एकदा धमकीवजा इशारा दिलीय. (MLA Sanjay Gaikwad threatened Shivsena party avctivists) तर कालच्या राड्यात कमी झालं कारण त्याठिकाणी पोलीस होते, मात्र पुढच्या वेळेस आणखी जास्त राडा होईल, असा इशाराही संजय गायकवाड यांनी ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांना दिलाय.
बुलढाण्यामध्ये काल ठाकरे (Uddhav Thackeray) गटाचे नवनियुक्त पदाधिकारी यांचा सत्कार समारंभ कार्यक्रम चालु असताना, आमच्या नेत्यांवर टीका का करता, म्हणत शिंदे गटातील आमदार संजय गायकवाड यांचे पुत्र कुणाल गायकवाड आणि कार्यकर्त्यांनी या कार्यक्रमात राडा करत पदाधिकाऱ्यांना मारहाण केली होती, खुर्च्यांची तोडफोड करत कार्यक्रम उधळून लावला होता. त्यानंतर पुन्हा संजय गायकवाड यांनी हे वक्तव्य केलंय.
कुठल्या ना कुठल्या निमित्ताने ठाकरे विरुद्ध शिंदे हा वाद रंगताना पाहायला मिळतोय. दसरा मेळावा असेल किंवा ठाण्यातील नवरात्र उत्सव मात्र सुरुवातीला केवळ मुंबईत दिसणारा हा वाद आता स्थानिक ठिकाणी देखील उफाळून यायला लागलाय.