मुंबई क्रिकेट असोसिएशन अर्थात MCA ची निवडणूक पार पडली आणि या निवडणुकीत अमोल काळे (Amol Kale) हे अध्यक्षपदी निवडून आले तर अन्य पदांवर मिलिंद नार्वेकर, जितेंद्र आव्हाड (Milind Narvekar, Jitendra Awad) हे देखील निवडून आले. मात्र केवळ या निवडणुकीमध्येच नव्हे तर गेल्या काही दिवसांपासून मिलिंद नार्वेकर चर्चेत आले आहेत. एकनाथ शिंदे (Eknath Shinde)यांनी शिवसेना सोडल्यावर मिलिंद नार्वेकर यांची भेट घेतली होती आणि त्यानंतर अनेक चर्चा सुरू झाल्या होत्या. आता ठाकरे कुटुंबीयांशिवाय देखील मिलिंद नार्वेकर यांनी MCA निवडणूक जिंकली आहे. मिलिंद नार्वेकर हे शरद पवार आणि आशिष शेलार यांच्या गटातून निवडणुकीसाठी उभे होते (Milind Narvekar stood for election from the group of Sharad Pawar and Ashish Shelar). या गटाला एकनाथ शिंदे यांचा देखील पाठिंबा होता. त्याचवेळी सर्वांना मोठा धक्का बसला होता.
शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे सचिव असलेले मिलिंद नार्वेकर या गटात आले तरी कसे हे काही कोणाला कळत नव्हतं. मात्र, निवडणूक झाली आणि मिलिंद नार्वेकर सर्वाधिक मतांनी निवडूनही आले.
मुंबई क्रिकेट संघटनेच्या निवडणुकीसाठी सर्वपक्षीय नेते उपस्थित होते. याच निवडणुकीत उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे आणि तेजस ठाकरे (Uddhav Thackeray, Aditya Thackeray and Tejas Thackeray) यांना मुंबई क्रिकेट संघटनेचे सदस्य म्हणून मतदानाचा अधिकार होता. मात्र, मतदानात तीन पैकी एकाही ठाकरेंनी उपस्थिती लावली नाही. त्यामुळे ठाकरे कुटुंबियांनी मुंबई क्रिकेट संघटनेच्या निवडणुकीला दांडी मारली असली तरी मिलिंद नार्वेकर हे सर्वाधिक मतांनी विजयी ठरले. त्यानंतर मुंबई क्रिकेट संघटनेच्या वर्तुळात ठाकरेंशिवाय देखील मिलिंद नार्वेकर विजयी झाले, अशा चर्चा सुरू झाल्या. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे MCA निवडणुकांपूर्वी जवळपास तीन बैठकांना उपस्थित होते. मात्र, उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे, तेजस ठाकरे या तिघांपैकी कोणीही मतदानासाठी आले नाही किंवा वानखेडे स्टेडियम परिसरात फिरकले देखील नाही. त्यामुळे ठाकरेंच्या मतदानाशिवायही मिलिंद नार्वेकर सर्वाधिक मतांनी जिंकू शकले हे बरच काही बोलून जातं.