मुंबई: मुंबईतील एका क्रुझवर धाड टाकल्यानंतर बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान याला ताब्यात घेण्यात आलं होतं. आता या प्रकरणाला राजकीय वळण लागलं आहे. त्यानंतर आता राष्ट्रवादीचे प्रवक्ते आणि राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी या प्रकरणी पत्रकार परिषद घेत भाजपाचे नेते एनसीबी अधिकारी बनून कारवाई करतात असा घणाघाती आरोप केला आहे.
यासंदर्भात आता मनीष भानुशाली यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे, आम्ही त्यांना पकडलं नाही. सगळी कारवाई एनसीबीने केली. मी सोबत चाललो होतो. आम्हाला जी माहिती मिळाली होती ती साक्षही नोंदवायची होती म्हणून आम्ही गेलो होतो. नवाब मलिक जे आरोप करत आहेत त्यात तथ्य नाही. भाजपामध्ये माझ्याकडे कुठलंही पद नाही. के. पी. गोसावी कोण आहेत तेदेखील मला माहित नाही, असे भानुशाली म्हणाले.
अरबाज मर्चंटला अटक करणारा मनिष भानुशाली हा भाजपचा उपाध्यक्ष असल्याचे त्याच्या फेसबुक अकाऊंटवरुन दिसून आले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि इतर भाजपच्या प्रमुख नेत्यांसोबत त्याचे फोटो आहेत.