एकीकडे राज्यसभेच्या निवडणुकीसाठी (Rajya Sabha elections) जबरदस्त रस्सीखेच सुरू आहे. एकुण सहा जागांसाठी सुरू असलेल्या राज्यसभेच्या या निवडणुकीसाठी भाजपने सातवा उमेदवार उभा केल्यामुळे रस्सीखेच वाढली आहे. शिवसेनेचे आमदार मुंबईतील रिट्रीट हॉटेलमध्ये दाखल होत आहेत. आपल्या येणाऱ्या आमदारांची भाजपने ताज हॉटेलमध्ये मुक्कामाची सोय केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस आणि कॉंग्रेस आपल्या आमदारांना आज सुरक्षितस्थळी हलविणार असल्याची माहिती आहे.
राज्यसभेच्या निवडणुकीसाठी महाविकास आघाडी आणि भाजप नेत्यांकडून जबरदस्त प्रयत्न सुरू असतानाच राष्ट्रवादी काँग्रेसचे मंत्री दत्तात्रय भरणे (Dattatray Bharane)आणि खडकवासल्याचे भाजप आमदार भीमराव तापकीर (Khadakwasla MLA Bhimrao Tapkir) मंगळवारी सकाळी पुण्यातील (Pune) तळजाई टेकडीवरील आल्हाददायक वातावरणात हास्यविनोद करण्यात रंगले होते.
सकाळच्या भेटीच्या वेळी जरी राजकारणाची चर्चा होण्याची शक्यता कमी असली तरी देखील राजकीय विरोधक असलेल्या आमदारांना एकत्र हसताना, बोलताना पाहून टेकडीवर फिरायला येणाऱ्या पुणेकरांनी आश्चर्य आणि आनंद अक्षय संमिश्र भाव मात्र व्यक्त केला.