TOD Marathi

राज्याच्या सत्ता संघर्षावर (Maharashtra Political Crisis) आज सुप्रीम कोर्टात (Supreme Court) सुनावणी होणार होती. यापूर्वी या सत्ता संघर्षाची सुनावणी तीनदा पुढे ढकलण्यात आली होती. 22 ऑगस्टला ही सुनावणी होणार होती, मात्र त्यानंतर 23 ऑगस्टला सुनावणी होईल असे स्पष्ट झालं. आणि 23 ऑगस्टला हे प्रकरण आता घटनापीठाकडे (Constitutional Bench) वर्ग करण्यात आलेलं आहे. महाराष्ट्रातील राजकीय सत्तासंघर्षावर आता पाच न्यायमूर्तींचे घटनापीठ सुनावणी देणार आहेत.

राज्यातील सत्ता संघर्षाच्या संदर्भातली पुढची सुनावणी आता घटनापीठासमोर येत्या गुरुवारी होणार आहे. यापूर्वीही राजकीय वर्तुळासह अनेकांनी हे प्रकरण घटनापीठाकडे वर्ग करण्यात यावं, असं मत व्यक्त केलं होतं आणि आता हे प्रकरण घटनापीठाकडे असणार आहे.

शिवसेना म्हणजे उद्धव ठाकरे गट विरुद्ध शिंदे गट अशी ही सुनावणी आहे. (Uddhav Thackeray Vs Ekanath Shinde) शिवसेना पक्ष कोणाचा? पक्ष चिन्हावर हक्क कोणाचा? आमदारांची अपात्रता अशा आणखी काही महत्त्वाच्या मुद्द्यांवर या प्रकरणात याचिका आहेत.