मुंबई | महाराष्ट्र सरकारचं खातेवाटप जाहीर झालं आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांना अर्थ खात्याची जबाबदारी देण्यात आली आहेत. तसंच छगन भुजबळ यांना अन्न आणि नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण खातं देण्यात आलं आहे. दिलीप वळसे पाटील हे सहकार मंत्री झाले आहेत तर धनंजय मुंडे हे कृषी मंत्री झाले आहेत. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री म्हणून मिळून आता मंत्रिमंडळात २९ मंत्री असणार आहेत. आपण जाणून घेऊ कुणाला कुठलं खातं मिळालं आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे सामान्य प्रशासन, नगर विकास, माहिती व तंत्रज्ञान, माहिती व जनसंपर्क, परिवहन, सामाजिक न्याय, पर्यावरण व वातावरणीय बदल, खनिकर्म आणि इतर कोणत्याही मंत्र्यांना वाटप न केलेले विभाग
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे गृह, विधी व न्याय, जलसंपदा व लाभक्षेत्र विकास, ऊर्जा, राजशिष्टाचार ही खाती
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे वित्त व नियोजन हे खाते
इतर २६ मंत्र्यांची खाती पुढीलप्रमाणे:
छगन भुजबळ – अन्न व नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण
दिलीपराव दत्तात्रय वळसे-पाटील – सहकार
राधाकृष्ण विखे-पाटील – महसूल, पशुसंवर्धन आणि दुग्ध व्यवसाय विकास
सुधीर मुनगंटीवार- वने, सांस्कृतिक कार्य, व मत्स्य व्यवसाय
हसन मुश्रीफ – वैद्यकीय शिक्षण व विशेष सहाय्य
चंद्रकांत पाटील – उच्च व तंत्रशिक्षण, वस्त्रोद्योग आणि संसदीय कार्य
विजयकुमार गावित- आदिवासी विकास
गिरीष महाजन- ग्राम विकास आणि पंचायत राज, पर्यटन
गुलाबराव पाटील- पाणीपुरवठा व स्वच्छता
दादाजी भुसे- सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम)
संजय राठोड- मृद व जलसंधारण
धनंजय मुंडे – कृषि
सुरेशभाऊ खाडे- कामगार
संदीपान भुमरे- रोजगार हमी योजना व फलोत्पादन
उदय सामंत- उद्योग
अब्दुल सत्तार- अल्पसंख्याक विकास व औकाफ, पणन
दीपक केसरकर- शालेय शिक्षण व मराठी भाषा
धर्मरावबाबा आत्राम – अन्न व औषध प्रशासन
अतुल सावे – गृहनिर्माण, इतर मागास व बहुजन कल्याण
शंभूराज देसाई- राज्य उत्पादन शुल्क
कु. अदिती तटकरे – महिला व बालविकास
संजय बनसोडे – क्रीडा व युवक कल्याण, बंदरे
मंगलप्रभात लोढा- कौशल्य विकास, उद्योजकता व नाविन्यता
अनिल पाटील – मदत पुनर्वसन, आपत्ती व्यवस्थापन
रवींद्र चव्हाण – सार्वजनिक बांधकाम
प्रा.तानाजी सावंत- सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण