TOD Marathi

मुंबई | उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी ( १३ जुलै ) उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली होती. २०१९ साली उद्धव ठाकरे यांनी जे केले, त्याला बेइमानीशिवाय दुसरे काहीच म्हणता येणार नाही. त्यांनी माझ्या नव्हे, तर भाजपच्या पाठीत खंजीर खुपसला. बेइमानी होते, तेव्हा कूटनीती वापरावी लागते. महाभारतातही हेच घडलं, असे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं होतं. याला उद्धव ठाकरे प्रत्युत्तर दिलं आहे.

‘मातोश्री’ निवासस्थानाबाहेर उद्धव ठाकरे हे कार्यकर्त्यांना संबोधित करत होते. “जनतेच्या खलबत्त्यात चाणक्य आणि त्यांची कूटनीती कुटून बारीक करायची आहे,” असं टीकास्र उद्धव ठाकरे यांनी फडणवीसांवर सोडलं आहे.

हेही वाचा ” …महाराष्ट्र सरकारचं खातेवाटप जाहीर! राष्ट्रवादीच्या मंत्र्यांना मिळाली ‘ही’ खाती”

“अर्धे उपमुख्यमंत्री बोलले राष्ट्रवादीबरोबर युती ही कूटनीती आहे. ही कूटनीती आपल्याला कुटून टाकायची आहे. जनतेचा खलबत्ता किती मोठा आहे, हे यांना कळलं नाही. चाणक्य खलबतं करतो. तर, जनतेचा खलबत्ता असतो. त्या खलबत्त्यात चाणक्य आणि त्यांची कूटनीती कुटून बारीक करायची आहे,” असा हल्लाबोल उद्धव ठाकरे यांनी फडणवीसांवर केला आहे.

“काही लोक पोहरादेवीला जाऊन खोटी शपथ घेतात. पण, त्यांनी खोटी शपथ घेताना देवीची मनातून माफी मागितली असेल आणि देवीनेही त्यांना माफ केलं असेल,” असा टोला देवेंद्र फडणवीसांनी उद्धव ठाकरेंना लगावला होता.