TOD Marathi

वेदांता फॉक्सकॉन (Vedanta Foxconn) हा प्रकल्प गुजरातमध्ये गेल्यानंतर महाराष्ट्रात राजकीय वातावरण तापलं होतं. महाविकास आघाडीचे नेते शिंदे-फडणवीस (Eknath Shinde-Devendra Fadnavis) सरकारवर तर सरकारच्या वतीने महाविकास आघाडीवर टीका करण्यात येत होती(Mahavikas Aghadi was criticized on behalf of the government) . या सगळ्या घडामोडींच्या नंतर शिंदे-फडणवीस सरकारमध्ये उद्योगमंत्री असलेले उदय सामंत (Uday Samant, Minister of Industries) आणि काही अधिकारी हे येत्या सोमवारी गुजरात (Gujarat) दौऱ्यावर जाणार आहेत.

उद्योगमंत्री उदय सामंत (Uday Samant) यांच्यासह सुधीर मुनगंटीवार (Sudhir Mungantiwar) हे देखील गुजरातमध्ये जाऊन तिथल्या योजनांचा आढावा घेणार आहेत. मुख्यमंत्री कार्यालयातील अधिकारी देखील त्यांच्यासोबत उपस्थित असतील. या दौऱ्यादरम्यान उद्योग मंत्री उदय सामंत हे अहमदाबाद येथे गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल (Bhupendra Patel) यांचीही भेट घेणार आहेत. गुजरातमध्ये सध्या कोणत्या चांगल्या योजना राबवल्या जात आहेत, यासंदर्भातील माहिती मंत्री सुधीर मुनगंटीवार आणि उदय सामंत हे गुजरातच्या मुख्यमंत्र्यांकडून घेणार आहेत.

जेणेकरून यापैकी काही योजना आपल्या राज्यात राबवल्या जाऊ शकतात, त्यामुळे महाराष्ट्रातील प्रकल्प गुजरातमध्ये गेला असला तरी गुजरातमधला विकासाचा पॅटर्न महाराष्ट्रात राबवण्याचा हा एक प्रयत्न राहू शकतो.

त्यामुळे सामंत आणि मुनगंटीवार यांच्या गुजरात दौऱ्याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. महाविकास आघाडी सरकारच्या काळात वेदांत फॉक्सकॉन (Vedanta Foxconn)प्रकल्पासाठी तळेगाव येथील जागेचा विचार केला जात होता.

सेमीकंडक्टर आणि ग्लास फॅब्रिकेशनचा हा प्रकल्प महाराष्ट्र राज्यात आला असता तर साधारण दीड ते दोन लाख रोजगारांची निर्मिती झाली असती आणि राज्यात एक लाख 58 हजार कोटींची आर्थिक गुंतवणूक झाली असती. मात्र, राज्यात सत्तांतर होताच हा प्रकल्प गुजरात मध्ये गेला आणि त्यानंतर अनेक प्रश्न उपस्थित झाले होते. एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप देखील झाले होते. याच संदर्भात आदित्य ठाकरे यांनी तळेगाव येथे मोर्चा देखील काढला होता.