पुणे: मुंबईतील क्रूझ ड्रग्ज पार्टी आणि आर्यन खान अटक प्रकरणातील एनसीबीचा पंच तसेच परदेशात नोकरी मिळवून देण्याच्या बहाण्याने अनेक तरुणांची फसवणूक केल्याचा आरोप असलेला फरार आरोपी के पी गोसावीला आज सकाळी पुणे पोलिसांनी अटक केलीय.
गेल्या अनेक दिवसांपासून पुणे पोलिसांच्या टीम के पी गोसावीला शोधत होत्या. त्याची लूक आऊट नोटिस देखील जारी करण्यात आलेली होती. त्यानुसार पुणे पोलिसांचं पथक त्याचा शोध घेत होतं. अखेर आज सकाळी पुणे पोलिसांनी गोसावीला अटक केलीय.
किरण गोसावी हा परदेशात नोकरी मिळवून देणाऱ्या के. पी. जी. ड्रीम्स रिक्रूटमेंट कंपनीचा मालक असल्याची माहिती आहे. के. पी. जी. ड्रीम्स कंपनीचं मुंबई आणि नवी मुंबईत कार्यालय आहे. बड्या पोलीस अधिकाऱ्यांच्या संपर्कात, खासगी गुप्तहेर अशीही के. पी. गोसावी याची ओळख आहे.